Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उदघाटन

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आज उदघाटन

विज्ञान दिंडीने सोहळयाचा प्रारंभ, खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचेसह मान्यवरांची उपस्थिती

साताराः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राजयविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि.प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये 44 वे जिल्हास्तरीय अधिवेशन आज मंगळवार दि.8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा आज मंगळवार दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनाची सुरूवात सकाळी 8.30 वा. विज्ञान दिंडीने होणार आहे या विज्ञान दिंडीत शालेय विद्यार्थ्यानी बनविलेल्या विविध उपकरणांचे दिंडीतून सातारकरांना दर्शन घडणार आहे अशी ही आगळीवेगळी दिंडी साताकरांसाठी औत्सुक्य व कुतूहलाचा विषय ठरणार असल्याने या दिंडीचे सातारकरांनी मोठया उत्साहात स्वागत करावे असे आवाहन न्यु इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी केले आहे.
सकाळच्या सत्रात विज्ञान दिंडीनंतर प्रदर्शनाचा उदघाटन सोहळयास खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रसिध्द जलतज्ञ डॉ.अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार असून यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि.प.शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालविकास समिती सभापती सौ. वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांचेसह सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, पं.स.सभापती मिलींद कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती सातारा जिलहा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, हणमंतराव जाधव व न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी दिली.
उदघाटन सोहळयानंतर दुपारी सर्पमित्र कैलास बागल यांचे व्याख्यान व स्लाईड शो होणार असून या कार्यक्रमासाठी नगरसेविका सौ. आशा पंडित या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. दु.2 वा. विज्ञानातील चमत्कार प्रयोग हे राम सुर्यवंशी सादर करणार असून या कार्यक्रमासाठी पत्रकार अतुल देशपांडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. सायं.5 वा. संपन्न होणार्‍या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमास सातारा शहरातील विविध शाळा गुणदर्शन सादर करणार असून या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य डॉ. संजीव गोखले हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
तीन दिवस चालणार्‍या या भरगच्च विज्ञान प्रदर्शनात 11 तालुक्यातून 66 विद्यार्थी व 55 शिक्षक सहभागी होणार असून प्रत्येक तालुक्यातून एक संघ निवडण्यात आला आहे. सातारा शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हे विज्ञान प्रदर्शन प्रथमच संपन्न होत असून यामध्ये शाळेच्या सुमारे 16 वर्गातून विज्ञान उपकरणे, विविध विषयांवर व्याख्याने, व स्लाईड शो, विज्ञानातील चमत्कार व प्रयोग, ई कचरा निर्मुलन व्याख्यान, संसाधन व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, कचरा व्यवस्थापन, कृषी व जैविक शेती, गणितीय प्रतिकृती सादर केल्या जाणार आहेत तसेच शाळेच्या प्रेक्षागृहापुढील भव्य मैदानात विशेष मंडप व्यवस्था करण्यात आली असून त्यात विज्ञान प्रश्‍नमंजुषा व वर्क्तृत्व स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन यासोबत व्यसनाधिनता टाळणे, पर्यावरणावर व्याख्यान या विषयावर व्याख्यान तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रम,. गीतगायन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
प्रदर्शनाचा समारोप दि.10 जानेवारी रोजी दु. 2 वा. सातारा व जावली तालुंक्याचे आ.श्री.शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ. अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे,डे.ए.सोसायटी पुणेच्या नियामक मंडळाचे सदस्य अनत जोशी यांसेसह जि.प. सदस्या सै. अनिता चोरगे, रेश्मा शिंदे, सौ.मधू कांबळे, भाग्यश्री माहितेे, अर्चना देशमुूख, मनोज घोरपडे व यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न होणार आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular