Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी132 वा अ‍ॅडव्हान्स जंगल ट्रेनिंग कॅम्प

132 वा अ‍ॅडव्हान्स जंगल ट्रेनिंग कॅम्प

त येथील अ‍ॅडव्हेंचर ट्रेकर असोसिएशन महाराष्ट्र या राज्यव्यापी ट्रेकिंग संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही कोयना अभयरण्यजवळील वासोटा किल्ल्यासमोरील घनदाट जंगलात अ‍ॅडव्हान्स जंगल ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन उन्हाळी सुट्टीमुळे करण्यात आले आहे. हा अ‍ॅडव्हान्स जंगल ट्रेकिंग कॅम्प दि. 3 ते 10 मे या कालावधीत होत आहे. या मोहिमेत वन्य प्राणी दर्शन, प्राण्याच्या वर्तनाचा अभ्या, वनस्पती वर्तन अभ्या, झुमरिंग, रॉॅक क्लायबिंग, रोप क्लायबिंग, कराटे, सुर्यनमस्कार, लाठीकाता, जंगल जीप सफाळी, आर्चरी प्रशिक्षण, तंबु उभे करणे, फिशिंग, स्विमींग, रात्रीची सुरक्षा गस्ती घाणले, जंगल भ्रमंती, नाईट ट्रेकींग, भोजन बनविणे व त्याचा आस्वाद घेणे इत्यादी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अ‍ॅडव्हास जंगल ट्रेकिंग कॅम्पमध्ये 75 ते 80 वनऔषधी वनस्पतींची माहिती, वन्य प्राणी प्रशिक्षणार्थ्यांस पहावयास न मिळाल्यास प्रशिक्षण फ्री संपूर्ण परत, प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास इच्छा असल्यास चित्तथरारक रोप वे मधून अवर्णनीय प्रवास अशा अनेक खास वैशिष्ट्यांचा या कॅम्पमध्ये समावेश असणार आहे. हा अ‍ॅडव्हान्स जंगल ट्रेकींग कॅम्प येथील कोयना अभयरण्यातील वासोटा किल्ल्या समोरील घनदाट जंगलात वरील कालावधीत होणार असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 2 मे पूर्वी संस्था सचिव सुरेश साळुंखे प्लॉट नं 1, 70/अ गिरीविहार गृहनिर्माण हौ. सोसायटी, फॉरेस्ट कॉलनी विलासपूर यांच्याशी प्रत्यक्ष अथवा मो. 9422039139/ 7773929295 वर संपर्क साधावा असे आवाहन संस्था अध्यक्ष प्रकाश गवळी व कार्याध्यक्ष बापूसाहेब जाधव यांनी केलेली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular