म्हसवड ः जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली काढण्यात येऊन क्षयरोगाच्या लक्षणांची माहिती आरोग्य सेवक तायडे यांनी दिली.
येथील माण देशी फौंडेशन संचलित माणदेशी तरंग वाहिनी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.3 यांच्या वतीने विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातून क्षयरोग जनजागृती रॅली काढून घोषणा देत उपचार घेण्याविषयी आवाहन करण्यात आले. या रॅलीला मार्गदर्शन करताना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवडचे आरोग्य सेवक श्री तायडे यांनी क्षयरोग किती भयंकर आहे आणि किती लवकर आणि कसा पसरतो या विषयी माहिती देऊन त्याच्या उपचार पध्दतीची माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की, आपल्या घरात, शेजारी, परिसरामध्ये जर कोणी दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकत असेल तर त्या व्यक्तीला सरकारी दवाखान्यामध्ये पाठवून द्या त्याची तपासणी करुन त्याच्यावर उपचार केले जातील क्षयरोग हा बरा होतो वेळेवर उपचार घेतल्यास क्षयरोग हा संपूर्णपणे बरा होतो.
ही जनजागरण रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.3 चे मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी सर, श्री तोरणे सर, श्री काळे सर सौ महाजन मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. माणदेशी तरंग वाहिनीची संपूर्ण टीम ही रॉली यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहिली. शेवटी मुलांना बिस्कीटाचे वाटप करण्यात आले.
क्षयरोग दिनानिमित्त म्हसवड मध्ये जनजागरण रॅली
RELATED ARTICLES