Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्साहात साजरी

सातार्‍यात मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्साहात साजरी

सातारा ः श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधु यांचे श्री मुरलीधर मंदिरात विशेष जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 3 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात आज मंदिरात सकाळी 7 वा. श्रीमुरलीधराची विशेष षोडशोपचार पुजा व पवमान पंचस्ाुक्त पठण वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे यांचे मार्गदर्शनाखाली दिवशीकर कुटूंबिय यांचेवतीने सुनित दिवशीकर यांचे हस्ते संपन्न झाली.त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत रामकृष्ण पाठशाळेच्या भगिनी वर्गाचे विष्णूसहस्त्रनाम,भगवदगीता,मधुराष्टकम व श्रीकृष्ण स्तोत्रांचे पठण झाले.
रविवारी रात्री जन्माष्टमीचे मुहुर्तावर वेदमूर्ती माधव शास्त्री भिडे व सहकार्यांंच्यावतीने विशेष पुजा, जन्मकाळ, जन्म अध्याय निरुपण, सहस्त्र तुलसी दल अर्पण, महाभिषेक, आरती व प्रसाद वितरण करण्यात आला.
भव्य संगमरवरी अश्या मुरलीधर कृष्ण मूर्तीचे मागे नव्याने पुण्यातील सुवर्ण कारागीरांनी बनवलेली चांदीची प्रभावळ, अतिशय सुमक आणि लक्षवेधी ठरलेला चांदीचा कोरीव कामाने युक्त असा देव्हारा व गजांत लक्ष्मीचे नक्षीकाम असलेले चित्र विशेष आकर्षण ठरत आहे.
दरम्यान काल गुरुवारी जन्माष्टमी निमित्त मंदिरात गोविंदशास्त्री जोशी यांच्या श्री वेदांत विद्यापीठातील 15 ब्रह्मवृदांचा मंत्रजागर व वेदपठण, सायंकाळी श्रीरामकृष्ण आश्रम येथील भक्तांचे शाम नाम संकिर्तन तसेच भजन गान संपन्न झाले.तसेच पानसुपारीचा कार्यक्रम संपन्न झाला.
उद्या शनिवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता सातारा येथील सौ. विद्या दिवशीकर यांचे गोपाळकाल्यानिमित्त लळीताचे किर्तन होउन दहीहंडी फोडून या जन्माष्टमी उत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती बाळासाहेब दिवशीकर यांनी दिली.
या जन्माष्टमी सोहळ्या निमित्त मंदिराला विशेष फुलांची आकर्षक सजावट, विद्युतरोषणाई तसेच महारांगोळ्यांनी सुशेाभीत केले आहे.या सोहळयात सातारकरांनी मोठ्या संख्येेने सोमवारी होणार्‍या दही हंडी व काल्याचे किर्तन कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन दिवशीकर बंधु यांनी केले आहे.या उत्सवाचे यशस्वी संयोंजनात सुरेश दिवशीकर, संदिप दिवशीकर,सचिन दिवशीकर, स्वानंद दिवशीकर, सुमेध दिवशीकर,श्री. वारुंजीकर गुरुजी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, सातारा शहरातील खणआळीतील मारवाडी राधाकृष्ण मंदिर, करंजेतील महानुभाव मठ, हामदाबाज येथील इस्कॉन संस्थेच्या राधकृष्ण मंदिरात तसेच नटराज मंदिरातील श्रीराधाकृष्ण मंदिरात, फलटण तालुक्यातील गिरवी येथील देशपांडे यांचे कृष्ण मंदिर, गोंदावले येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर यांचे समाधी मंदिरावरील गोपालकृष्ण मंदिर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात जन्मोत्सव साजरा झाला.
सातारा येथील नटराज मंदिरात जन्माष्टमी निमित्त तुलाभार आणि राधाकृष्ण ड्रेस स्पर्धेत शेकडो 12 वर्षे वयोगटापर्यंतचे बालराधा कृष्ण मोठ्या उत्साहात विविध आकर्षंक वेशभूषेत सहभागी झाले होते.
विविध कृष्ण मंदिरात रात्री उशीरापयर्ंत कृष्ण भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular