Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जावलीचा शिक्षण विभाग उभारणार १५ लाखांचा मदतनिधी

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जावलीचा शिक्षण विभाग उभारणार १५ लाखांचा मदतनिधी

मेढा ( वार्ताहर ) – सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी समवेत बैठक होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदतनिधी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार आज जावलीचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी जावली तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची ऑनलाईन तालुकास्तरीय बैठक घेऊन मदतनिधी देण्याबाबत आवाहन केले. या आवाहनास तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रति शिक्षक रुपये २०००/- मदत निधी देण्याचे मान्य केले.
सामाजिक बांधिलकीतून जावलीतील शिक्षकांनी या कोरोना विरुद्धच्या लढ्यात आजपर्यंत भरीव स्वरूपात सामाजिक कार्य केले आहे. कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व तालुक्याच्या आरोग्य सुविधांसाठी भरीव आर्थिक निधी उभारून मानवतेचा नवा जावली पॅटर्न यापूर्वीच निर्माण केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही प्रतिशिक्षक दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी पुढे आले असून जमा होणाऱ्या रकमेतून तालुक्यात दहा व्हेंटीलेटर बेडचे सुसज्ज असे कोरोना सेंटर उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
या ऑनलाइन सभेला प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवानराव मोहिते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत सुरेश चिकणे, सुरेश जेधे, दीपक भुजबळ, सूर्यकांत पवार, सुनील धनावडे, रघुनाथ दळवी, सुरेश शेलार, मिलन मुळे, संदीप किर्वे,गणेश तोडकर, संपत धनावडे,अजय पाडळे यांनी सहभाग घेतला. यावेळी जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी, माजी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती सौरव शिंदे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय गावडे, विजय सुतार, कांताबाई सुतार तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जावलीच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचे सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुक केले असून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, दिपक पवार,अर्चना रांजणे यांनी अभिनंदन केले आहे.
या ऑनलाइन बैठकीला उपस्थित असलेल्यांचे स्वागत अशोक लकडे यांनी केले तर आभार अरविंद दळवी यांनी मानले.ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या सहकार्याने ह्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लकडे यांनी केले.

सप्टेंबर महिन्यात आलेल्या पहिल्या लाटेवेळी जावली तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये काढून सात लाखांपर्यंत निधी जमा केला होता. त्या पैशांमधून अनेक कामं झाली असून पुनः निधी गोळा करून तालुक्यातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular