म्हासुर्णे (तुषार माने) :- म्हासुर्णे ता.खटाव.येथील जिवनधारा नागरी पतसंस्थेचा १६ वा वर्धापन दिन म्हासुर्णे येथील मारुती मंदिर येथे दिनांक ०४-०२-२०१९ रोजी सकाळी ९ वाजता जिवनधारा नागरी सहकारी पंतसंस्थेचे संस्थापक -चेअरमन ,सांगली जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.दत्तु (शेठ) सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस श्रीराम विद्यालयाचे चेअरमन महादेव माने,सोसायटी चेअरमन राजाराम माने,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिचंद्र माने,सोसायटी चेअरमन राजाराम माने,श्रीराम विद्यालयाचे सचिव राजाराम माने,ग्रा,प.सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,आर.जी.कुलकर्णी ,व्हि.एल.कुलकर्णी,ग्रा.प.सदस्या नलिनी कुलकर्णी,संगिता गुरव,जगन्नाथ सुर्यवंशी,पंढरीनाथ महाराज,तुळशीराम माने,एम.पी.माने या मान्यवंराच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी विलास माने,महादेव माने,आर.जी.कुलकर्णी,व्हि.एल.कुलकर्णी,राजाराम माने यांची भाषणे झाली भाषणामध्ये सर्वानी संस्थेचे तोंड भरुन कौतुक केले.तसेच म्हासुर्णे गावाला टेंभुचे पाणी वेळेवर मिळावे म्हणजे शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही व पाणी मिळाले तर ऊसारखे उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आले तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील त्याचा फायदा नक्कीच आपल्या संस्थेला होईल.संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे चेअरमन दत्तु (शेठ)सुर्यवंशी बोलताना म्हणाले की,3 फ्रेंब्रुवारी २००३ला हि शाखा सुरू झाली पंधरा वर्षात अनेक संकटांचा सामना करावा लागला अनेक चांगले वाईट अनुभव आले.दर दहा वर्षात दुष्काळ अशी परिस्थिती आपणास पाहवण्यास मिळते आहे.दुष्काळात मात करुन ही हि संस्था अजही आपला चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहे.अनेक परिस्थिती वर मात करुन संस्था यशस्वी वाटचाल करत आहे.तसेच गावातील युवकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल ती मदत केली जाईल तरी युवकांनी या व्यवसायात यावे.या संस्थेने १हजार ते ४० लाखापर्यत कर्जे वाटप केले आहेत.यापुढे शेतकऱ्यांनी शेती बरोबर जोडधंदा सुरू करुन आपली प्रगती करावी .येणाऱ्या काही वर्षात संपूर्ण शिवारात बारामती सारखा शिवार बघायला मिळेल.सर्व पोटपाटाची कामे झाली की सर्व भागात सुजलामसुफलाम पहावयास मिळेल. यावेळी या कार्यक्रमास ए.आर.दबडे सर,गोरख माने (पैलवान),अधिक माने,हेमंत कुलकर्णी,सुरेश माने,रामचंद्र माने,शिवाजी माने,विठ्ठल माने,गोरख कदम तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा ,उपाध्यक्षा,गावातील ग्रामस्थ व संस्थेचे सभासद उपस्थित होते,कार्यक्रमावेळी संस्थेच्या वतीने सुरूवातीस आर जी.कुलकर्णी यांनी सर्वाचे स्वागत केले.ऐ.आर.दबडे सर यांनी संस्थेच्या वतीने उपस्थिताचे आभार मानले.