Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीजग्वार लँड रोव्हर इंडिया आपला विद्युतीकरणाचा प्रवास 2019 मध्ये सुंरू करणार

जग्वार लँड रोव्हर इंडिया आपला विद्युतीकरणाचा प्रवास 2019 मध्ये सुंरू करणार

सातारा/ मुंबई: जग्वार लँड रोव्हर इंडिया भारतात आपल्या विद्युतीकरण केलेल्या उत्पादनांच्या अनावरणासाठी प्रयत्नशील आहे. जग्वार लँड रोव्हरच्या 2020 पर्यंत संपूर्ण उत्पादन श्रेणी विद्युतीकरणाचे पर्याय आणण्याच्या जागतिक वचनबद्धतेचा भाग म्हणून जग्वार लँड रोव्हर इंडिया 2019पासून पुढील पाच वर्षांत हायब्रिड वाहनांपासून ते बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत (बीईव्ही) विविध उत्पादने आणण्याचा विचार करत आहे.
2019 संपेपर्यंत जग्वार लँड रोव्हर आपली लँड रोव्हरमधील पहिली हायब्रिड वाहने आणेल. 2020च्या दुसर्‍या सहामाहीत जग्वार लँड रोव्हर इंडिया जग्वार आय-पेस हे पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणण्याचा विचार करत आहे.
जग्वार लँड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले की,
जग्वार लँड रोव्हर स्वतःसाठी एक अधिक शाश्वत भविष्य आणण्यासाठी प्रयत्नशील असून आमच्या अभियंत्यांनी आम्हाला या मार्गावर नेण्यासाठी अत्यंत योग्य उत्पादने विकसित केली आहेत. जग्वार लँड रोव्हरच्या भारतातील उत्पादन श्रेणीत विद्युतीकरण केलेली वाहने आणणे हे सरकारचा विद्युत वाहनांवरील भर अधोरेखित करते. कंपनीला भारत सरकारकडून फेम- खखचे सादरीकरण आणि भारतातील चार्जिंग इन्फ्रोस्ट्रक्चरच्या विस्तारावर फोकस करण्याद्वारे प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे ठरलेल्याग वेळेत सर्व प्रकारच्यात इलेक्ट्रीक वाहनांना जलदतेने स्विकारण्यामध्ये मदत मिळेल.
या कंपनीला भारत सरकारच्या फेम-2 आणि चार्जिंग सुविधांच्या विस्तारावरील लक्ष्यामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अंगीकार होण्यास मदत होईल. आमच्या उत्पारदनांबाबत अधिक माहितीसाठी क्षरर्सीरी.ळप आण श्ररपर्वीेींशी.ळप येथे भेट द्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular