Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीजिहे ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे निर्विवाद वर्चस्व

जिहे ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे निर्विवाद वर्चस्व

सातारा: संपुर्ण सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिहे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन एकहाती सत्ता मिळवली. ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह 9 जागांवर विजय मिळवला तर, एक जागा बिनविरोध झाली.
लोकनियुक्त सरपंचपदी सुशिला कुंभार (919 मते) यांचा विजय झाला. वार्ड क्र. 1 मध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे महेश जाधव, सिंधु ङ्गडतरे, हेमा झनकर, वार्ड क्र. 2 मध्ये संदीप ङ्गणसे, भानुदास सुतार आणि नलिनी ङ्गडतरे तर, वार्ड क्र. 3 मध्ये बजरंग ङ्गडतरे आणि वर्षा ङ्गडतरे हे उमेदवार विजयी झाले. या सर्वांचा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदमसिंह ङ्गडतरे, विास ङ्गडतरे, हणमंत गोरे, हेमंत सावंत, संजय ङ्गडतरे, चंद्रकांत ङ्गडतरे, विलास ङ्गणसे, सुनिल भोसले, निलेश ङ्गडतरे, रामराव जाधव, हणमंत ङ्गडतरे, सतपाल ङ्गडतरे, नामदेव ङ्गडतरे, निलेश देशमुख, अनिल घाडगे, गुलाब मुलाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, जिहे ग्रामस्थांनी ज्या विश्‍वासाने गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे तो विश्‍वास सार्थ ठरवत नुतन सरपंच आणि सदस्यांनी गावाचा कायापालट करावा. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकोप्याने काम करावे असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आणि गावाच्या विकासासाठी वाट्टेल ते सहकार्य करु, असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular