Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीकोरोना लढाईत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेढा या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केले...

कोरोना लढाईत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेढा या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केले ग्रामीण रुग्णालयाला साहित्याचे वाटप ; सन १९९१ ते १९९८ मधील माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

 

मेढा :- ( वार्ताहर ) सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना या लढाईत मेढा ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक साहित्याचे वाटप  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेढा यामधील सन १९९१ते १९९८ मधिल माजी विदयार्थी यांच्या मार्फत करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा यामधील सन १९९१ते १९९८ मधिल माजी विदयार्थी यांनी शैक्षणिक उपक्रमासाठी जमविलेली रक्कम सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वापरली. ग्रामीण रुग्णालय मेढा येथिल रुग्णांसाठी कोरोना उपचाराकरीता आवश्यक असणारे साहित्याची गरज लक्षात घेवून अमित कापरे, नवनाथ देशमुख, विवेक तोडकर, अमोल लकेरी, अकबर मेसमान, अतुल इगावे आणि ग्रुपचे सदस्य यांनी ६०० सलाईन बॉटल व सिरीज देवून आपले कर्तव्याची भुमिका पार पाडली.

या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव, वरिष्ठ औषध निर्माता शैलेंद्र गायकवाड ,संदीप गार्डे ,सौरभ शेलार शाळा ग्रुपचे सदस्य आणि ग्रामीण रुग्णालयाचे औषध निर्माता विवेक सरडे, उपस्थित होते. यावेळी शाळा ग्रुप मधील सदस्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनेरुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल व कामकाज याबद्दल डॉ. यादव सरांनी माहिती सांगितली आणि या उपयुक्त मदतीबाबत सर्वांचे आभार मानले.

व्हॉट्स अपच्या माध्यमातुन एक चांगले कार्य घडू शकते याचा प्रत्यय येत असून या युवकांचा आदर्श इतरांनीही घेवून युवकांनीही सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे.
डॉ.चंद्रकांत यादव
वैदयकिय अधिक्षक

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular