Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीगेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवलेगेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवले

गेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवलेगेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवले

सातारा : गेंडामाळ येथे मुस्लीम समाजाची कब्रस्तानाची जागा आहे. याठिकाणी पैगंबरवासी झालेल्या व्यक्तींचे दफन केले जाते. या जागेवर नगरपालिकेने बगिचासाठी आरक्षण टाकले होते. हे आरक्षण उठवण्यासाठी मुस्लीम समाजबांधवांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन दिले होते. आरक्षण उठवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले होते. कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण नुकतेच उठवण्यात आले असून यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुस्लीम समाज बांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन करुन आभार मानले.  येथील गेंडामाळावरील मुस्लिमांच्या कब्रस्तानाच्या काही खुल्या जागेवर उद्यानाचे, बगिचाचे आरक्षण पालिकेने टाकले होते. ते आरक्षण उठवण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी मुस्लीम समाजाबांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेवून तसे लेखी निवेदनही त्यांना दिले होते. एका महिन्याच्या आत पडलेले आरक्षण उठवण्यासाठी सहकार्य करु, असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यावेळी दिले होते. सदर आरक्षण उठवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सकारात्मक सहकार्य करुन मुस्लीम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदर जागेवरील आरक्षण नुकतेच उठवण्यात आले. त्याबद्दल मुस्लीम समाजबांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला व आभार मानले.  यावेळी गेंडामाळ कब्रस्तान अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष आरीफ शेख, इरफान बागवान, मुस्ताक सय्यद, इफ्तेखाब बागवान, युसूफ शेख, अस्मल कुरेशी, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, दिलावर शेख, महंमदअली बागवान, अ‍ॅड. शाहीद शेख, नगसेवक शकील बागवान, मन्सूर बागवान, आसिफ शेख, मुबीन बागवान यांच्यास   चंदन घोडके, विलास कासार, बबलू केंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  उपस्थित मुस्लीम बांधवांनी आपली समस्या सोडवल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. तसेच कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. यालाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सकारात्मकता दर्शवली असून येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध करुन देवू आणि कायम पाठीशी राहू असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित मुस्लीम बांधवांना दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular