भुईंजः खडकी ता.वाई येथे आज मंगळवारी रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचे भव्य किर्तन होणार सलग 36 वर्षे ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे संयोजन करर्णाया खडकी ग्रामस्थ यांचा उत्साह शिगेला खडकी ता.वाई येथे ज्ञानेश्वर भजन मंडळ खडकी़ पारायण मंडळ व ग्रामस्थ मंडळ खडकी यांच्या संयुक्त विद्यामानाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे त्रितपपुूर्ती निमित्त भव्य किर्तन महोत्सव होत असून आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2019 रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचे भव्य किर्तन होणार आहे. बुधवारी 27 मार्च रोजी संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास यांचे किर्तन तर गुरूवार 28 मार्च रोजी काल्याचे किर्तन माऊली महाराज कुदळे मुंबई यांचे होणार आहे. खडकी येथील जेष्ट वारकरी कै.ह.भ.प.भिकोबा नारायण शिंगटे व कै.ह.भ.प.तात्याबा वामन शिंगटे यांच्या प्रेरणेने ह.भ.प.अरविंद बुवा शिंगटे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ मंडळ अतिशय सुंदर नियोजन केले आहे. याचा शुभारंभ नुकताच शुक्रवारी 22 मार्च रोजी शिक्षण पे्रमी पै.जयवंत पवाऱ पत्रकार जयवंत पिसाळ खडकीच्या सरपंच सरोज शिंगट़े प्रशांत उर्फ शंकर शिंगट़े नंदकुमार शिंगटे यांच्या हस्ते झाला.
खडकी येथे आजपासून ज्ञानेश्वरी सोहळयाचे आयोजन
RELATED ARTICLES