Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीकश्मीरा पवार , गणेश गायकवाड प्रकरण ; साताऱ्यात रिपाईच्या आंदोलनाने गुन्ह्याची कलम...

कश्मीरा पवार , गणेश गायकवाड प्रकरण ; साताऱ्यात रिपाईच्या आंदोलनाने गुन्ह्याची कलम वाढवण्यास यश , आंदोलन स्थगित

(अजित जगताप )
सातारा दि: सातारा येथे आरोपी कश्मिरा पवार आणि गणेश गायकवाड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. यासाठी रिपाइंचे गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहून सातारा पोलीस यंत्रणेने तातडीने वाढीव कलम लावल्यामुळे या आंदोलनाला यश आलेले आहे. यावेळी चंद्रकांत कांबळे, अक्षय वाघमोडे, विशाल गायकवाड, विशाल कांबळे व रिपाइंचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
       याबाबत माहिती अशी की, भारत देशाच्या पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार म्हणून बनावट कागदपत्रे बनवून आरोपी कश्मिरा संदीप पवार व गणेश गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. एवढेच नव्हे तर देशाच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या संरक्षण  व इतर खात्यामध्ये ठेके मिळवून देतो. अशी बतावणी केली होती. हा गंभीर आरोप असूनही त्याचा तपास फारसा गांभीर्याने करण्यात आला नाही. त्यामुळे  रिपाइंचे गवई गटाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या धरणे आंदोलनामुळे जिल्ह्यातील अनेक संघटनेने पाठिंबा दिला .या प्रकरणाची सखोल चौकशी करावी .वेळ पडल्यात या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. असे स्पष्ट केले होते .या आंदोलनात सहभागी झालेले श्री फिलीप बांबळ यांच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 12१२/ ऑब्लिक२०२३  भारतीय दिंडी विधान कलम १७० नुसार चार जानेवारी २४ रोजी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ४२०,४६५,४६८,४७१  या कलमाची वाढ करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी कश्मिरा संदीप पवार वय २८ व गणेश हरिभाऊ गायकवाड यांना १९ जून रोजी अटक करण्यात आली होती.
        याबाबतही आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फिलिप भांबळ ,अमरजीत संभाजी भोसले व गोरख जगन्नाथ मरळ यांच्या सांगण्यावरून जाब  नोंदविण्यात येईल. असे सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आंदोलन करताना जावक क्रमांक ७८८३/२०२४ नुसार दिनांक ४ जुलै२०२४ रोजी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे. वास्तविक पाहता सातारा पोलीस दलाचे नावलौकिक मोठ्या प्रमाणात होता . आता आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे फिर्यादी व तक्रारदार यांना लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यानंतरच सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र व्यवहार केला जातो. ही बाब उघडकीस आल्यामुळे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खास बाब म्हणून सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेचा आढावा घ्यावा अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान,सातारा पोलीस दलाने वाढीव कलम लावून सत्य बाजू ऐकून घेतली. त्याबद्दल आंदोलकांनी आभार मानले आहेत.
———————————————-
केंद्र सरकारने सर्व  भारतात भारतीय दंड विधान कलम ४२० बदलून त्या ठिकाणी ३१६ कलम सुरू करून पोलीस यंत्रणेला तशा सूचना केल्या आहेत. परंतु सातारा पोलीस ठाण्यात आजही ४२० कलमाचाच वापर होत असल्याचे निदर्शनास आले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular