Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीप्रयत्नशील युवकांच्या पाठीशी कराड अर्बन बँक: अजिंक्य कोत्तावर

प्रयत्नशील युवकांच्या पाठीशी कराड अर्बन बँक: अजिंक्य कोत्तावर

कराड: समाजातील समस्या ही आव्हाने समजून त्या समस्या सोडविण्यासाठी युवकांनी शोधक नजरेने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत तरच आपण यशस्वी होऊ शकते यावर विश्‍वास ठेवला पाहिजे, अशा प्रयत्नशील युवकांसाठी मी माझे सर्वस्व द्यायला तयार आहे आणि कराड अर्बन बँक त्यासाठी आपल्या सदैव पाठीशी राहणार आहे ही समाजासाठी सकारात्मक बाब आहे असे उद्गार नागपूर येथील ज्ञान ङ्गौंडेशनचे संस्थापक व युवा शास्त्रज्ञ अजिंक्य कोत्तावर यांनी काढले.
कराड अर्बन बँक आणि सातारा येथील कै. वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या उद्योजकता विकास शिबीरप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अजिंक्य कोत्तावर बोलत होते.
यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे सर्व संचालक, सर्व वरिष्ठ अधिकारी, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रारंभी अजिंक्य कोत्तावर यांचा बँकेच्या वतीने श्री महालक्ष्मीची प्रतिमा, ङ्गरची टोपी व मोत्यांची माळ देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना अजिंक्य कोत्तावर म्हणाले की, मी अनेक अडचणींवर मात करून पाटणबोरीया या गावातून यवतमाळ व पुढे नागपूरला जाऊन माझे शिक्षण पुर्ण केले. लहानपणापासून नवनवीन समस्या शोधून त्यावर मात करून नवीन संशोधन केले. त्यामुळेच आज माझ्या नावावर अठरा पेटंट नोंदले गेले.
आपण आपल्यातील नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारांची कास घरून आपले ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी अविरतपणे कष्ट घेतले पाहिजे. आजची शिक्षणपध्दती ही पुस्तकी ज्ञानावर आधारित असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण सोनम वांगचूक यांच्या प्रेरणेतून आपण पुढील काळात प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारित शिक्षणप्रणाली समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना कोत्तावर पुढे म्हणाले की, अगदी लहानपणापासून आपण नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून चहाच्या पानातून बायोडिझेल हे इंधन मी 2014 साली तयार केले. अशा प्रकारचा शोध लावणारा मी जगातला पहिला शास्त्रज्ञ ठरलो. त्यामुळे युवकांनी आपल्यातला एक गुण जरी जपला तरी तुम्ही खुप पुढे जाल.
सकारात्मक विचार करा आणि त्यात आपले समाधान शोधा. निव्वळ नोकरीच्या मागे न लागता जगण्याची दिशा ठरवून एकाग्रतेने आपल्या संशोधन करा आणि आपल्या देशाच्या प्रगतीत भर घाला. चांगली स्वप्ने बघा, त्याचा पाठपुरावा करा, त्यातून निश्‍चित यश मिळते त्यासाठी सतत प्रयत्न करा असेही यावेळी बोलताना कोत्तावर म्हणाले.
प्रारंभी कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजात उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी समाजातील चांगल्या व यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभावे व युवकांना प्रेरणा देण्याचे काम अशा शिबीरातून व्हावे यासाठी बँकेने या शिबीराचे आयोजन केले आहे. या भागातील युवा पिढीने अजिंक्य कोत्तावर यांचे मार्गदर्शन घ्यावे व नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा अशा प्रयत्नशील युवकांच्या मागे बँक निश्‍चितपणे उभी राहील.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची अजिंक्य कोत्तावर यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच सहभागी झालेल्या युवकांच्या कुपन्सचा लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम म्हणाले की, अजिंक्य कोत्तावर यांचे मार्गदर्शन आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक असेच आहेत. त्यांच्या विचारांचा व मार्गदर्शनाचा लाभ घेवून युवकांनी आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वी करावी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular