कराड : नवीन कृष्णा पुलाचे बांधकाम करताना जुना कृष्णा पुल पाडला जाणार नाही. तसे कोणतेही नियोजन नाही. गुहागर- पंढरपुर महामार्गाचे मजबुतीकरण करताना अन्य ठिकाणीही नवीन पुल बांधताना जुने पुल पाडलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कोल्हापुर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांनी प्रशासनाच्यावतीने दिली.
गेल्या काही दिवसांपासुन ऐतिहासिक जुना कृष्णा पुल पाडण्यात येणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. याबाबत तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण यंाच्या पुढाकाराने पत्रकार, लोकप्रतिनीधी व नागरिक तसेच, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, मान्यवर यांनी प्रत्येक्ष पुलाची पहाणी केली होती. त्यानंतर 10 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक होवुन जुना कृष्णा पूल बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समिती मार्फत संबधित प्रशासकिय विभागांना निवेदन देण्याचा ठरावही संमत करण्यात आला. या सर्व बेैठकांना कृती समिती सदस्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
जुना कृष्णा पुल पाडला जाऊ नये यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. त्याची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आला होता. त्याची प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आली. त्यानुसार आज 17 मे रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले, उपअभियंता रमेश पन्हाळकर, अभियंता अमर देशमुख, इलियास संदे, पारेखरकर, कुलकर्णी यांनी पत्रकार, लोकप्रतिनीधी, संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकां समवेत पुलाची पाहणी केली त्यानंतर बोलताना अशोक भोसले यांनी जुना कृष्णा पुल पाडण्यात येणार नाही, अशी ग्वाही देतानाच नवीन पुलाचे बांधकाम सुरू असताना सुध्दा लहान वाहनांची वाहतुक बंद करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र अवजड वाहनांची वाहतुक नवीन पुलावरून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. तसेच या संदर्भात कृती समितीच्या सदस्यांबरोबर सामुहिक बैठक घेण्याचेही भोसले यांनी आश्वासन दिले. यावेळी सुधीर एकांडे, कराडचे नगरसेवक सौरभ पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत यादव, शेतकरी संघटनेचे अनिल बापू घराळ, भाजपाचे पांडुरंग तवर, शिवसेना शहर प्रमुख शशिकांत करपे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
जुना पुल पाडण्याचे नियोजन नाही कोल्हापुर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यंाची स्पष्टोक्ती
RELATED ARTICLES