कराड: संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिट समाज व नगरपालिकेच्या वतीने कराडात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी आरोग्य सभापती प्रियांका यादव, प्रितम यादव, परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, पं.स.सदस्य अर्चना गायकवाड, माजी नगरसेविका सुनंदा प्रकाश जाधव, आर.एस.रसाळ, दिगंबर यादव, तानाजी पवार, संजय गायकवाड अदि उपस्थित होते.
कराड तालुका परिट समाज सेवा मंडळाच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 26 वा वधुवर पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.नामदेवराव ननवरे व प्रमुख व्याख्याते अॅड. संभाजीराव मोहिते यांनी संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा उहापोह समाजासमोर केला.
यावेळी झालेल्या वधुवर मेळाव्यात समाजातुन मोठा सहभाग दिसून आला.सुमारे 100 हुन अधिक मुला मुलीनी आपले नावे नोंदवली होती.
यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानास परिट समाज बांधवासह नगरपालिकेचे अधिकारी मिलिंद शिंदे, मारुती काटरे, खवळे, कांबळे, भोसले यासह समाजाचे सदस्य उपस्थित होते.
परिट समाज व नगरपालिकेच्या वतीने कराडात स्वच्छता अभियान
RELATED ARTICLES