Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीकराडची प्रियदर्शनी जिल्हयात मुलींत प्रथम

कराडची प्रियदर्शनी जिल्हयात मुलींत प्रथम

कराड : कराड येथील कन्याशाळेची विद्यार्थिनी प्रियदर्शनी प्रशांत शेवाळे हिला दहावीच्या परीक्षेत 98.40 टक्के गुण मिळाले. जिल्हयात मुलीमध्ये तिचा पहिला क्रमांक आला. दररोज किमान चार तास अभ्यास करून तिने हे यश मिळवले. शास्त्रज्ञ होऊन देशसेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
कन्याशाळेची यशाची परंपरा कायम ठेवण्यात प्रियदर्शनी हिचा मोठा वाटा आहे. कन्याशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या मुलींची संख्या 47 आहे. 20 विद्यार्थीनीनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्याच शाळेतील धनश्री निंबाळकरने गणित विषयात 100 पैकी 100 गुण पटकावले आहेत. त्यात प्रियदर्शनी शेवाळै हिने 98.40 टक्के गुण पटकावत शाळेसह जिल्हयात पहिला क्रमांक पटकावला आहे. शेवाळेवाडी- उंडाळे प्रियदर्शनाचे मूळगाव आहे. सध्या ती कराडमध्ये राहते. तिचे आई-वडील डॉक्टर असुन विहे येथे ते त्यंाचा वैद्यकीय व्यवसाय करतात.
प्रियदर्शनी म्हणाली, अभ्यासासाठी शाळेतुनही चंागला प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका शर्मिला बायस, उपमुख्याध्यापक वांगीकर, पर्यवेक्षक ए.जी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनीही मदत केली. शाळेतुन घरी गेल्यावर अभ्यासातील सराव कायम ठेवला. त्यामुळे यशापर्यंत पोचता आले. घरातुन अभ्यासाला चांगलाच पाठिंबा मिळत होता. विशेषकरून आईने घेतलेला सराव अधिक चांगल्या पध्दतीने फायद्याचा ठरला. उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ व्हायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक अभ्यास करणार आहे. शास्त्रज्ञ होवुन देशसेवा करायची इच्छा आहे. शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्ष शिल्पा वाळिंबे, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी सत्कार केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular