कराड : ग्राहकांना एखादी वस्तू खरेदी करण्याकरिता दहा दुकाने फिरावे लागतात, त्याची चौकशी करावी लागते. परंतु कराड शॉपिंग फेस्टिवलमध्ये एका छताखाली खरेदी करण्याची कराडकरांना संधी मिळणार असून त्याचा लाभ नक्कीच होणार, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
आजपासून चार दिवस चालणार्या रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरॅक्ट आयोजित कराड शॉपिंग फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल फासे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, शशांक पालकर, राजेश खराटे, हेम उद्योग समूहाचे बिपीन शाह, हेमंत शाह, कराड पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेविका विद्या पावसकर, संभाजीराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जखिणवाडीचे सरपंच नरेंद्र पाटील, अजितराव पाटील चिखलीकर, शिवाजीराव पवार, इनरव्हील क्लब आणि प्रीतीसंगम क्लबचे जगदीश वाघ तसेच क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. चव्हाण म्हणाले, आज देशामध्ये लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत चालला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ लागल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या लोक सक्षम होऊ लागल्याने आवश्यक सोयी सुविधा मिळविण्यासाठी लोक खरेदी करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा सोयीस्कर वस्तू खरेदी करण्यासाठी रोटरी क्लबने कराडमध्येच कराड शॉपिंग फेस्टिवल 2019 च्या माध्यमातून लोकांना संधी उपलब्ध करून दिली आहे.
कॅन्सर हा गंभीर आजार रोखण्यासाठी रोटरी क्लबने जनजागृती सुरु केली आहे. धुम्रपानामुळे लोकांना कॅन्सर होत असला तरी आता प्रदूषणामुळे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. पाणी आणि भाजीपाला तपासणी केंद्रांची आवश्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी आणि भाजीपाला शरीरास सुयोग्य आहे की नाही तपासता येईल. शॉपिंग फेस्टिवल यशस्वीपणे उभारल्या बद्दल आ. चव्हाण यांनी रोटरी क्लबचे अभिनंदन केले.
रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल फासे म्हणाले, रोटरी क्लबच्या सदस्यांचे व्हिजन आणि अॅक्शन यांचा मेळ बसल्यामुळे एक स्वप्नवत शॉपिंग फेस्टिवल कराडमध्ये साकारले आहे. यावर्षी 140 स्टॉल ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना घरगुती वस्तूंपासून ते चारचाकी गाडीपर्यंत सर्व गोष्टींची खरेदी करता येणार आहे.
शॉपिंग फेस्टिवलसाठी कराड अर्बन बँक, नगरपरिषद तसेच इतर संस्थांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले आहे. शॉपिंग फेस्टिवल हि एक सामाजिक संस्था असून त्यामाध्यासातून समाजासाठी वेगळ काही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॅन्सर रोगाविषयी जनजागृती करीत आहोत. त्यासाठी कृष्णा रुग्णालयानेही सहकार्याची भूमिका बजावली आहे.
आपल्या कराडमध्ये एखाद शॉपिंग सेंटर उभ व्हावं, अशी इच्छा अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली. जागेअभावी या गोष्टी होऊ शकत नाहीत, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. कराड शॉपिंग फेस्टिवल 2019फ औपचारिक उद्घाटनानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या अद्यावत हॅरिएर एसयुव्ही या चारचाकी गाडीचे अनावरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आज दि. 9 ते 12 फेब्रुवारी पर्यंत शॉपिंग फेस्टिवल सुरु राहणार आहे.
कराड शॉपिंग फेस्टिवलमध्ये एका छताखाली खरेदी करण्याची संधी : आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES