Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीकराड तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी मुल्ला तर सचिवपदी कदम

कराड तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी मुल्ला तर सचिवपदी कदम

मसूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाशी संलग्न असलेल्या कराड तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी कराड येथील शाहीन हायस्कूलचे इम्रान मुल्ला व सचिवपदी श्रीकांत कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कराड उत्तरचे आ.बाळासाहेब पाटील व यशवंतनगर ता.कराड येथे सहयाद्री शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर.कदम हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना इम्रान मुल्ला म्हणाले, मी आजवर कराड तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्हयात शिक्षकेतर संघटनेत कार्यरत राहून करत असलेल्या कामाची पोहोच पावती मिळाली असून यापुढे संघटना मजबूत करून शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेईन.
कार्यक्रमाचे प्रास्ताचिक भागवतराव पाटील यांनी केले.सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी केले तर आभार अनिल माने यांनी मानले.यावेळी पर्यवेक्षक एस.बी.जाधव, शानभाग सर, प्रकाश पाटील,अर्जुन वीर, सुनिल नांगरे,रमेश कांबळे, यशवंत भांगे,विश्‍वंभर चव्हाण, शिवाजी पवार, अधिक चव्हाण आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular