ढेबेवाडी : करपेवाडी, ता. पाटणच्या हद्दीत एका ऊसाच्या शेतात 17 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केलेली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत ढेबेवाडी पोलीस व घटना स्थळावर मिळालेल्या माहितीनुसार करपेवाडी येथील कुमारी भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने (वय 17) ही तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालय इयत्ता 12 वीच्या कला शाखेत शिकत होती व तळमावले येथील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. नुसतीच 12 वीची परीक्षा जवळ आल्यामुळे कामावरून सुट्टी घेतली होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजला निघून गेली होती दुपार पर्यंत घरी का आली नाही म्हणून आई व आजी व घरच्या लोकांनी शोध घ्यायला सुरवात केली.
करपेवाडीतून तळमावलेला जाणार्या पाणंद रस्त्यावरील देसाई शेत शिवारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. यानंतर आई व आजीने हंबरठा फोडला झालेली घटना कळताच तळमावले, करपेवाडी परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. ही गोष्ट कळताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनी उत्तमराव भजनावळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पुढील तपास त्याच्या मार्गदर्शनखाली ढेबेवाडी पोलीस करत आहेत. या घटनेची फिर्याद मुलीचे वडील संतोष माने यांनी दाखल केली आहे.
युवतीचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या
RELATED ARTICLES