Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकासला केळवली तांबी 5 कि.मी. रस्ता जोडल्यास पर्यायी वाहतूक उपलब्ध

कासला केळवली तांबी 5 कि.मी. रस्ता जोडल्यास पर्यायी वाहतूक उपलब्ध

परळी (अल्पेश लोटेकर) : कास पठारावर रस्ता खचल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे तर पर्यायी कोळघर कुसुंबी घाट ही दरड पडल्याने ठप्प आहे. कास बामणोलीला जोडणारा पर्यायी कायमस्वरुपी असणारा केळवली तांबी हा रस्ता असू शकतो या मार्गावर सुमारे चार ते पाच किलोमीटर हा रस्ता जोडणे बाकी आहे.
कास पठारावरून तांबी जुंगटी जळकेवाडी केळवली असा हा मार्ग आहे सद्यस्थितीत तांबी ते जुगटी हा पक्का रस्ता आहे तर जुंगटी ते जळकेवाडी हा कच्चा रस्ता आहे जळकेवाडी दत्तवाडी केळवली हा रस्ता जोडणे बाकी आहे. या रस्त्यावरच अगदी थोड्या प्रमाणात वन खाते लागते वनखाते लागले तरीही या मार्गावर झाडांची कुठेही कत्तल करावी लागत नाही.
केळवली पर्यंत आल्यास केळवलीपासून परळी सातारा पर्यंत डांबरी रस्ता आहे तसेच परळी उरमोडी धरण गजवडी फाटामार्गे सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी येथील पवनचक्की पठार असे पर्यटकांना फिरता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे कास रस्त्यावर कोठेही दरड पडली किंवा काही दुर्घटना घडल्यास फार कमी कालावधीत कमी खर्चात हा रस्ता पर्याय होऊ शकतो.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular