Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीवणवाप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

वणवाप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

केळघर : वनपरिमंडळ मेढा अंतर्गत असणार्‍या हुमगांव (ता.जावली) फॉ.कं. नं.-280 पार्ट मधील वनक्षेत्रात काल दि.26 रोजी दुपारी 12 -00 वाजता वणवा लागलेला दिसुन आला. वनरक्षक हुमगाव रामचंद्र परधाने व रोजंदारी मजूर यांनी आग विझवली. त्याकामी भारतीय वनअधिनियम, 1927 चे कलम 26(1)(ब)(क) चे उल्लंघण झाले. बाबत वनरक्षक हुमगांव प्र गु रि नं -04/2019 दि. 26.02.2019 अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर गुन्ह्यातील आरोपी कृष्णा विठोबा मालुसरे याला दि.27/02/2019 रोजी एस.पी. शिंदे वनपाल मेढा यांनी अटक करून मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मेढा येथे हजर केले असता दि.17/03/2019 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. उपवनसंरक्षक सातारा डॉ.भारतसिंग हाडा, सहाय्यक वनसंरक्षक सातारा किरण कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा सचिन डोंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरंग शिंदे, वनपाल मेढा हे पुढील तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular