सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांनी, साधू, संत किंवा कोणत्याही धर्माच्या धर्मगुरुंनी जातीभेद नाही केला. तशी शिकवणही दिली नाही. 21 व्या शतकातून जात असताना अजुनही जातीभेदाचे राजकारण कशासाठी. या जगातील माणुसकी गेली कुठे, असा सवाल करत खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जातीधर्माच्या नावावर राजकिय पोळ्या भाजून देशाची अखंडता धोक्यात आणू पाहणा-यांना लोकशाहीतील राजे म्हणजे मतदारांनी खड्यासारखे बाजूला काढावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराडच्या मोमिन मजिद हॉलमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक मजहरभाई कागदी, नगरसेवक फारूखभाई पटवेकर, बाबासाहेब पटेल, अलेज मुतवल्ली, माजी नगराध्यक्ष अलताफ़भाई शिकलगार, अखतरभाई आंबेकरी, इसाकभाई सवार आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रार्थना कोणत्याही धर्माची असो ज्या परंपरा पुर्वीपासून चालत आल्या आहेत त्या बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही असे सुरुवातीस स्पष्ट करुन उदयनराजे म्हणाले, मी कधीच खोटं बोलत नाही. जातियवाद आमच्या रक्तातच नाही. धर्म आचरणाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील पण सर्वांचा माणूसकी हा धर्म एकच आहे. सत्तेत असो अगर नसो, मी आहे तोपर्यंत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
उदयनराजे पुढे म्हणाले, आज लोक खुप स्वार्थी झालेत. स्वार्थापोटी वैयक्तिक विचार करतात. इतरांच काहीही होऊ दे, माझा विकास झाला पाहिजे. असे स्वार्थी विचार मनात येतात कुठून. हुकूमशाही प्रवृत्तींच्या हातात सत्ता गेली आहे. यावेळी ती चुक सुधारली नाही तर देशातील अन्यायकारक कायदे बदलता येणार नाहीत. चुका सर्वांकडून होतात, त्या सुधारणे महत्वाचे असते. नाहीतर आपल्याला आपली पुढची पिढी कदापि माफ करणार नाही.
देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात विविध समाज घटकाबरोबर मुस्लिम समाजानेही योगदान दिले. मात्र आजही आमच्या समाजबांधवांना दुय्यम वागणूक मिळते. मुस्लिम गद्दार नाहीत. ते आजही अडचणीत आहेत. मुस्लिमांना बाकी काही नको,फक्त हक्काची भाकरी खाऊ द्यात. आणि यासाठी उदयनराजे तुम्हीं आम्हाला तुम्हीं आमच्या सोबत हवे आहात, अशी अपेक्षा मजहर कागदी यांनी व्यक्त केली.
फारूखभाई पटवेकर म्हणाले, लोकसभेच्या गेल्या 2 निवडणूकांत कराडच्या मुस्लिम समाजाने उदयनराजेंची पाठराखण केली.
याही वेळी त्यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा मोठा वाटा असेल. छत्रपती घराण्यावर मुस्लिम समाजाची पहिल्यापासून निष्ठा आहे. कराड-पाटण मधील मुस्लिम समाज उदयनराजेंना अंतर देणार नाही.
जाकीरभाई पठाण, हाफिज जावेद यांची भाषणे झाली. मजहरभाई कागदी यांच्या हस्ते उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रफीक मुलाणी, अबिद मांगलेकर, जाकीर विजापुरे, कारी फारूख, बरकत पटवेकर, हरूण तांबोळी, निसार बेपारी, हाफिज जावेद, मजिदभाई आंबेकरी व समाजातील कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
देशाचे तुकडे करू पाहणार्यानां खड्यासारखे बाजूला कराः उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES