वेळे, वाण्याचीवाडी, पारगाव खंडाळा शेतकर्यांचा इशारा
सातारा : सातारा खंबाटकी नवीन बोगदा तयार करण्यासाठी वाण्याच्या वाडीतील शेतकर्यांचा विरोध नाही. वाण्याच्या वाडीतील शेतकर्यांची जमीन सध्याच्या हायवेलगत आहे. असे असताना खंबाटकी नवीन बोगद्यासाठी जामीला 43 ते 60 हजार रुपये दर दिला जात आहे. त्यात जीएसटी, टीडीएस कपात करून दर दिला जात आहे. शासनाकडून शेतकर्यांची अर्थिक फसवणूक केली जात आहे. 10 लाख रुपये गुंठा दर दिला नाही तर खंबाटकी बोगद्यासाठी जमिनी देणार नाही. तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय वाण्याच्या वाडीतील शेतकर्यांनी घेतला आहे. या प्रश्नावर ना. रामराजेंची भेट घेतली आहे. आता लवकरच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली जाणार आहे, असे शेतकर्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दरम्यान 10 लाख रुपये गुंठा दर मिळाला नाही तर हा बोगद्याचा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा वेळे, वाण्याचीवाडी, पारगाव खंडाळा या तीन गावातील शेतकर्यांनी दिला आहे.
यावेळी वाण्याच्या वाडीतील शेतकरी बोलताना म्हणाले की, सरकारने वण्याच्यावाडीतील शेतकर्यांच्या
जमीन 2011 साली वेळे एमिडीसीला आरक्षीत केल्या आहेत. वेळे एमिडीसीला सुमारे 750 हेक्टर जमीन घेतली आहे. त्या जमिनीवर औद्योगिक वसाहत आरक्षीत असे शिक्के पडले आहे. जमिनीवर शिक्के असतानाही नवीन बोगद्यासाठी जमीन घेतल्या आहेत. त्याही कवडीमोल दराने घेतल्या जात आहेत. नवीन बोगद्यसाठी 43 ते 60 हजार गुंठा दर दिला जाहीर केला आहे. आम्हाला हा दर मान्य नाही. 10 लाख रुपये गुंठा दर मिळाला पाहिजे. 10 लाख रुपये गुंठा दर मिळाला नाही तर हा बोगद्याचा प्रकल्प होऊ देणार नाही.
सुरुर गावातील जमिनींना हायवेसाठी 2015 ला 4 हजार रुपये गुंठा दर रस्त्यासाठी दिला होता. मग आता एवढा कमी दर का दिला जात आहे. जमीन हायवे लगत असतानाही ती जमीन हायवेला नाही असे दाखवून फसवणूक केली जात आहे.
अंतिम निवडा जाहीर होण्यापूर्वी च नुकसान भरपाई पत्र दिली जात आहेत. शेतकर्यांना विश्वासात न घेता शासन फसवणूक करत आहेत. जमिनींना 10 लाख रुपये दर देता येत नसतील तर बागायती जमिनी द्या. तर ते जमत नसेल तर आम्हीच त्या दराने शासनाला पैसे देतो असेही शेतकर्यांनी सांगितले.
विदर्भातील शेतकर्यांना रस्त्यासाठी 2011 साली 8 लाख रुपये गुंठा दर दिला जात होता. विदर्भातील जमिनीवर कुसळेही उगवत नाहीत. पण ते शेतकरी रस्त्यावर आले की, त्यांना दर दिला जात आहे. मग आमच्या बागायती जमिनींना का? दर दिला जात नाही. असा सवाल शेतकर्यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेस प्रकाश पवार, संजय पवार, विजय मोरे, सतीश महाजन, सचिन भिलारे व वेळे, वाण्याचीवाडी, पारगाव खंडाळा या तीन गावातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांच्या जमीनींना 10 लाख गुंठा दर मिळाला नाहीतर खंबाटकी बोगदा होऊ देणार नाही
RELATED ARTICLES