
पाल : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पाल येथील श्री खंडेराय व म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जय घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांची भंडार्याची व खोबर्याची उधळण केली.
पाल यात्रेतील प्रमुख मानकरी देवराज दादा पाटील यांना मान देवून सरपंच मुकुंद खंडाईत, उपसरपंच अमिर मुल्ला, ग्रा. प. सदस्य युवराज गोरे, जगन्नाथ पालकर, सयाजी काळभोर, मीना सुकटे, संदीप चव्हाण यांच्यासह ग्रामसेवक शरद चव्हाण, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट, व्हा. चेअरमन रघुनाथ खंडाईत, विश्वस्त उत्तमराव गोरे, संजय काळभोर यांनी पाल यात्रेमधील आलेल्या भाविकांची भक्त निवासमध्ये रहण्याची उत्तम सोय केली होती.

