Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी"धर्म ,जात ,पंथ , भाषा द्वेष सारे संपू दे , माणसाने माणसाशी...

“धर्म ,जात ,पंथ , भाषा द्वेष सारे संपू दे , माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ह्या पंक्ती प्रमाणे खिदमत ए खलक ग्रुप सातारा चे कार्य अविस्मरणीय असून आदर्शवत आहे


सातारा :- कोरोनाच्या महामारी मध्ये सर्व प्रकारच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा पर्दाफाश होऊन वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे रूप समोर आले आहे .सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातून सुरू झालेल्या खिदमत ए खलक ह्या कमिटीने सातारा जिल्हावासीयांसमोर आदर्श माणुसकीचे दर्शन घडविले आहे . मौजे आसगाव येथील सहदेव कृष्णा शिंदे यांचे कोरोनाने निधन झाले . सरपंच व इतर प्रमुख नागरिकांनी गेल्या वर्षभर कोरोनातील विविध आघाडीवर माणुसकीच्या सेवेसाठी सदैव ह्या ओळीप्रमाणे काम करणाऱ्या सातारा शहरातील खिदमत ए खलक कमिटीला संपर्क साधून अंतविधी करण्याबद्दल विचारणा केली असता खिदमत ए खलक च्या टीमने आसगाव येथे येऊन कोरोना महामारीच्या निकषाचे पालन करून अंतविधी केला . खिदमत ए खलक च्या योध्यांचे हे कार्य पाहून उपस्थितांच्या मनातील ,विचारातील जात ,धर्म ह्याचे अंतर आणि मळवट अग्नितील धुराप्रमाने उडून गेले आणि माणुसकीची एक ज्योत प्रत्येकाच्या हृदयात, विचारात पेटली. सरपंच ,प्रतिष्ठीत व्यक्तींनी खिदमत ए खलक ने घडविलेल्या ह्या माणुसकीच्या दर्शनाने पाणावलेल्या नेत्रासमेंत एक उपकाराचे ओझे हृदयावर ठेवत कोरोना योध्यांचा पुढील कार्याला शुभेच्छा देत आभार मानत निरोप दिला.
आज दिनांक 11 मे रोजी सकाळी सकाळी खिदमत ए खलक कमिटी साताराचे सदस्य सलीम शेख यांना आसगाव मधील संबंधित व्यक्तीचा संपर्क झाला व त्यानी कोरोना संशयित सहदेव कृष्णा शिंदे यांच्या अंतविधी बद्दल सहकार्य मागितले असता खिदमत ए खलक चे कुटुंब प्रमुख सादिकभाई शेख व साजिद शेख यांच्या मार्गदर्शनानुसार खिदमत ए खलकच्या कमिटीचे फ्रंट लाईन वारीअर असिफ फरास ,आरिफ खान ,इम्रान सय्यद ,अस्लम कागदी यांना अंतविधीची जबाबदारी सोपवली. स्वखर्चाने ppe किट व इतर सामुग्री घेऊन असगावचा मार्ग धरला. आसगाव चे सरपंच सचिन शिंदे व इतरांनी यांनी धार्मिक विधीची सर्व तयारी करून ठेवली होती .खिदमत ए खलक चे योध्दे असिफ फरास ,आरिफ खान ,इम्रान सय्यद ,अस्लम कागदी यांनी ppe किट परिधान करून कोरोनाच्या निकाषप्रमाणे मृतदेहाला तिरडीमध्ये घेऊन अर्ध्या किलोमीटर अंतर असलेल्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन मुखाग्नी देत अंतविधीचा सोपस्कार केला . अंतविधी सुरुवातीपासून धास्तावलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना धीर देण्याचे मोलाचे काम सुद्धा खिदमत ए खलक च्या कमिटीने करत सुरक्षा व काळजी कशी घ्यावी ह्याचे देखील धडे दिले.
ना कोणाचे नातेवाईक ना जातीचे ना पंथाचे परंतु बंधन आमुचे माणुसकीच्या नात्याचे ह्याची प्रचिती खिदमत ए खलकच्या कमिटीने आसगावच्या नागरिकांना दिली .
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई शेख , साजिद शेख ,मुबिन महाडवाले ,हाजी मोहसीन बागवान यांनी माणुसकीच्या नात्याने माणुसकीच्या सेवेसाठी सदैव ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे वेगवेगळ्या पातळीवर कार्य करण्यासाठी खिदमत ए खलक कमिटीची स्थापना केली सुरुवातीला 10 जणांची बनलेल्या ह्या कमिटीमध्ये आज 40 जण कार्यरत असून प्रसिद्धीपासून कोसो दूर रहात ही कमिटी गेली वर्षभर कार्य करत आहे . कमिटीचे सदस्य इतर पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या टीम शी जोडले असून जिथे काम तिथे आम्ही अश्याप्रमाणे कार्यरत असतात. लक्षणे आढळल्यास औषधांचे प्राथमिक किट मोफत देण्यापासून वाफऱ्याच्या मशीनची सुद्धा वाटप कमिटीने केले आहे . त्याप्रमाणे नातेवाईकांना धीर देत आत्मविश्वास वाढविण्यासाठी दूरध्वनी वरून संपर्क ठेवत कुटुंबाला धीर देणारी एक कमिटी कार्यरत आहे.डॉ फैय्याज व डॉ गुलजार यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार व ऍडमिशन मध्ये सहकार्य करण्यासाठी एक कमिटी कार्यरत आहे. कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांना चहा नाष्ठा व वेळप्रसंगी जेवण वाटप करणारी एक कमिटी कार्यरत आहे . गरजवंताना अन्न धान्य वाटपाचे काम सुद्धा खिदमत ए खलक मार्फत केले जात आहे. लक्षण असलेल्या रुग्णाला किट पासून ऍडमिशन ,जेवण तसेच नातेवाईकांच्या निवाऱ्याची सोया देखील खिदमत ए खलक कमिटी करत असून सर्वात महत्वाचे धार्मिक विधीप्रमाणे अंतविधीचा सोपस्कार देखील खिदमत ए खलक कमिटी करत आहे .जम्बो कोविड सेंटर येथे आलेल्या रुग्णांना धीर देत नातेवाईकांना दिलासा देणे व ऑक्सिजन मशीन लावणे तसेच अल्पोपहाराचे नियोजन करण्याचे काम कमिटी करत आहे. कमिटीचे सदस्य सलीम शेख ,असिफ खान ,असिफ फरास,आरिफ खान ,अब्दुल सुतार ,हाफिज मुराद ,अज्जूभाई शेख , मोहसीन पेंटर ही रोज सकाळी व रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णाच्या मदतीला कार्यरत असतात .
आसगाव येथील आज खिदमत ए खलक कमिटीच्या सदस्यांनी घडविलेल्या माणुसकीचे दर्शनाने माणुसकी अजूनही जिवंत असून धर्म, जात ,पंथाच्या भिंती तोडल्या आहेत व माणुसकी हाच धर्म व भारतीय हीच जात असल्याचे सिद्ध झाले आहे .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular