Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीउत्कृष्ठ कामाबद्दल खिंडवाडी ग्रामपंचायत आय.एस.ओ. मानांकनाने सन्मानित

उत्कृष्ठ कामाबद्दल खिंडवाडी ग्रामपंचायत आय.एस.ओ. मानांकनाने सन्मानित

सातारा : सातारा शहराजवळील खिंडवाडी ग्रामपंचायतीस उत्कृष्ठ कामाबद्दल सोर कन्स्लटींग कंपनीचे वतीने आय. एस. ओ. मानांकन नुकतेच सरपंच संजय चोरगे व उपसरपंच शितल सावंत ग्रामसेवक ए. पी. ठोंबरे यांना देवूून सन्मानित करण्यात आले.
खिंडवाडी ग्रामपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या नियमा प्रमाणात सर्व कागदपत्र आद्यवत केली, रेकॉर्ड आद्यवत ठेवले, शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करुन त्यांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिला, याबद्दल जागतीक स्तरावरील सोर कन्स्लटींग कंपनीने सर्व्हे करुन आय.एस.ओ. मानांकन जाहीर केले होते. खिंडवाडी ग्रा. पं.साठी आय.एस.ओ.प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. या प्रसंगी सरपंच संजय चोरगे, उपसरपंच शितल सावंत, ग्रामसेवक ए. पी. ठोंबरे व ग्रा. प. सदस्य अमर पवार, नितीन काळे, उमेश मोहिते, लता जाधव, रजनी साखरे, शारदा यादव, सिमा कुडाळकर, लक्ष्मण घनवट आदी उपस्थित होते.
खिंडवाडी ग्रा. पं. साठी आय. एस. ओ. मानांकन मिळवून देण्यासाठी पं. स. गटविकास अधिकारी डॉ. सौ. अनिता गावडे पवार, विस्तार अधिकारी (ग्रा. पं.) प्रकाश साळुंखे, विद्यमान ग्रा. पं. पदाधिकारी, ग्रामसेवक, माजी ग्रा. पं. पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले तर सोर कन्स्लटींग सर्व्हीसेस पुणेचे लिड ऑडीटर समिर रुपलग व त्यांचे सहकारी आशिष रुपलग यांनी लेखा परिक्षण केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular