कोरेगांव : सोळशी या आमच्या गावात यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत थोड पाणी वापरण्यास मिळत होतं, परंतू तेही संपल्याने आता मात्र दुष्काळी परिस्थितीने आमचं पशुधन, शेती पुरती अडचणीत आली आहे, अशीच दुष्काळी परिस्थिती 2002 मध्ये सोळशी गावावर आली होती. त्यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी सोळशीमध्ये चारा छावणी उभारून जनावरांना चारा पाण्याची सोय करून आम्हांला खर्या अर्थाने संजीवनी दिली. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये मदनदादांच्या नेतृत्वाखाली किसन वीर व्यवस्थापन आमच्या पाठीशी खंबीर उभे राहील्याने सोळशी आणि किसन वीर कारखान्याच्या नात्याची वीण घट्ट झाली असल्याचे, प्रतिपादन सोळशी, ता. कोरेगावचे उपसरपंच विशाल सोळस्कर यांनी केले.
किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिलेले आहे. सोळशीे (ता. कोरेगांव) येथील सोळशी खिंड ते वैदी फार्म शिवार येथे डीपीसीसीटी, तालाबांध आणि खोली रूंदीकरण व खोलीकरण व इतर जलसंधारण कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम,सचिन सांळुखे,चंद्रसेन शिंदे, विजय चव्हाण, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर म्हणाले, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी दुष्काळी भागातील पाण्याची गरज ओळखून मदत करण्याची भुमिका घेतलेली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन श्रमदान केल्यास दुष्काळ कायमचा हटण्यास मदत होणार आहे. बाळासाहेब सोळस्कर यांनी आपल्या मनोगतामध्ये आमच्या गावात ऊसाचे उत्पादन कमी होत असताना सुध्दा किसन वीर कारखान्याने केलेली मदत आम्हांला लाखमोलाची आहे. त्यांच्या मदतीने आम्ही दुष्काळी परिस्थितीवर निश्चित मात करून किसन वीर कारखान्यास केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद दिले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन कामांचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय फाळके, हरिभाऊ धुमाळ, दत्तात्रय धुमाळ,विजयराव धुमाळ, अमर धुमाळ,दत्तात्रय सोळस्कर, सोमनाथ सोळस्कर, चंद्रकांतराव सोळस्कर, किसनराव सोळस्कर, बाजीराव सोळस्कर,जितेंद्र सोळस्कर, विश्वभंर यादव,औंदुबर यादव,सुरज यादव,सुभाष देशमुख यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, संचालक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसन वीर साखर कारखान्याने नात्याची वीण घट्ट केली : विशाल सोळस्कर
RELATED ARTICLES