Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकिसन वीर कारखान्याची मदत लाख मोलाची

किसन वीर कारखान्याची मदत लाख मोलाची

भुईंज : नागेवाडीमध्ये किसन वीर कारखान्याच्या सभासदांची संख्या कमी असूनही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मदनदादा भोसले यांनी व त्यांच्या व्यवस्थापनाने पोकलेन मशिन देऊन आमच्या गावाला जी मदत केलेली आहे. ही मदत आमच्या नागेवाडी गावासाठी लाख मोलाची ठरणार असून यापुढील काळातही असेच सहकार्य करावे, असे आवाहन निलेश भोसले यांनी केले.
किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्‍या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिले आहे. नागेवाडी, ता. कोरेगांव येथील बाबाचा झरा येथील पाणलोट धरणाचे रूंदीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, डॉ. दत्तात्रय फाळके, सरपंच नामदेव चव्हाण, उपसरपंच बाबुराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोसले पुढे म्हणाले, बाबाचा झर्‍याचे रूंदीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे नागेवाडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास तर मदत होणारच आहे परंतु शेती आणि पशुधनही वाचण्यास मदत होणार आहे. या कामासाठी ग्रामस्थ एकजुटीने काम करीत असून कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखाना व्यवस्थापनाने पोकलेन मशिन दिल्यामुळे आमच्या कामाला गती तर मिळालेली आहेच परंतू यामुळे आमचा उत्साहही वाढला असल्याचे भोसले यावेळी म्हणाले. यावेळी कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे यांनी नागेवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने या जलसंधारण कामात मदत करण्याबाबत आवाहन केले. अजित खताळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास कुंडलिक रोमन, वसंत चव्हाण, रामदास चव्हाण, हेमंत चव्हाण, सतिश चव्हाण, सोपान माकर, भाडळे गावचे सरपंच रोहिदास घोरपडे, नारायण खताळ, दत्तात्रय खताळ, विकास घोरपडे, लक्ष्मण खताळ, तुकाराम खताळ, विलास खताळ, निळकंठ घोरपडे, नानासाहेब ढोले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular