Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीऑक्सिजन टँकरसाठी कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकार्‍यांमध्ये वाद ; अखेर तो ऑक्सिजन टँकर सातारा जिल्हा...

ऑक्सिजन टँकरसाठी कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकार्‍यांमध्ये वाद ; अखेर तो ऑक्सिजन टँकर सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल

सातारा : सध्या देशात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला असून अनेक राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. वैद्यकीय उपचारांविना रुग्णांचे जीव जात आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. जिथं ऑक्सिजनवरुन दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकार्‍यांमध्ये वाद झाला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकार्‍यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकार्‍यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला. ऑक्सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना सातार्‍याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकार्‍यांची उच्च पातळीवर चर्चा झाली.
तो टँकर सातारचा – ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकार्‍यांनी फोनवरुन दिली. तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी या कंपनीकडून स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.
कोरानाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीतच सातारा येथील वाडी फाट्यावर पोलिसांकडून ऑक्सिजनचा टँकर थांबवण्यात आला. संबंधित टँकर  नेमका कोणत्या जिल्ह्यासाठी आला आहे. याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
आज दुपारच्या सुमारास पुणे बेंगलोर हायवे वर वाडे फाटा या ठिकाणी एक ऑक्सिजन टँकर पोलिसांकडून थांबवण्यात आला. संबंधित ऑक्सिजन टँकर चालकाला याबाबत विचारणा केली असता हा टँकर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आला असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूरच्या दिशेने निघालेला हा ऑक्सीजन टँकर कोल्हापूर साठी नसून सातारा जिल्ह्यासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येताच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संबंधित टँकर हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आला नसून सातारा जिल्ह्यासाठी आला आहे अशी माहिती देण्यात आली. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी संबंधित टँकर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आला असल्याचे सांगितल्याने दोन्ही जिल्हाधिकार्‍याना मध्ये वाद झाला. सविस्तर चर्चेअंती संबंधित टँकर सातारा जिल्ह्यासाठी पाठवण्यात आला असल्याची खात्री झाली. यानंतर संबंधित टँकर सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल झाला.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular