Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात आजपर्यंत एकूण आठ जण "कोरोना मुक्त" ;  3 बाधित रुग्णांचे  दोन्ही नमुने...

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण आठ जण “कोरोना मुक्त” ;  3 बाधित रुग्णांचे  दोन्ही नमुने निगेटिव्ह आज सोडणार घरी ; 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर  14 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल 

सातारा दि. 29( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे दाखल असणाऱ्या तीन कोविड-19 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक             डॉ.  आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 33,कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 1  असे एकूण 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.

दिनांक 28 एप्रिल रोजी उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 14 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी  पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.  

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular