सातारा ः शहरातील कोटेश्वर पुलाची उंची व रुंदीकरणाचे काम गतीमान झाल्याने या परिसरातील नागरिकाना व व्यवसाईकाना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले काही महिने या पुलाचे काम सुरु असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. प्रवास करणार्या वाहनचालकाना गडकर आळीमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत होता. परंतू या पुलाचे काम आता अंतिम टप्यात आल्याने नजीकच्या काळात या पुलावरुन अधि.तरित्या ये जा करण्यासाठी वाहनचालकाना मार्ग खुला होणार आहे. यामुळे शाहुपूरीकडे ये जा करणार्या वाहनचालकाना व नागरिकाना या मार्गावरुन प्रवास करणे सुखकर होणार आहे. गेले अनेक वर्ष या पुलाचे उंची व रुंदीकरण व्हावे यासाठी या परिसरातील नागरिकांची मागणी होती. अखेर सातारचे श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यानी यामध्ये पुढाकार घेवून हा प्र्रश्न मार्गी लावला आहे. या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे नागरिक व वाहनचालकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा शहरा नजीक असलेले उपनगर शाहुपूरी मधील नागरिक व वाहनचालकाना कोटेश्वर पुलावरुन ये जा करणे शिवाय अन्य सोयीचा मार्ग नसल्याने या पुलावरुन नागरिक व वाहनचालकाकडून या पुलाचा वापर केला जात होता. काळाच्या ओघात हा पुल अरुंद असल्याने व वाढलेल्या लोकवस्ती व वाहनाच्या संख्येमुळे या पुलावरुन प्रवास करणे धोक्याचे ठरत होते.
शहरातील कोटेश्वर पुलाचे काम अंतिम टप्यात
RELATED ARTICLES

