Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमेढा येथे लोक सहभागातून उभारणार कोविड केंद्र, एकूण ६०बेड च्या माध्यमातुन होणार...

मेढा येथे लोक सहभागातून उभारणार कोविड केंद्र, एकूण ६०बेड च्या माध्यमातुन होणार उपचार सुरु :- तहसिलदार राजेंद्र पोळ

मेढा ( वार्ताहर ) – जावली तालुक्यातील नागरिकांना सोई सुविधा मिळावी याकरीता लोकसहभातून कोव्हिड केंद्र उभारणार असल्याची माहिती जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.
मेढा येथिल जुना एस.टी. स्टॅन्ड, आणि जुनी आय.टी.आय इमारतीची पाहणी करत असताना येथे उपचार केंद्र सुरू होत असून नागरीकांना येथे कोणत्याही औषधोपचाराची कमतरता जाणवणार नाही अशी ग्वाही देवून जावली विभागातील शिक्षकांच्या निधीतुन आयसोलेशन व DCSC सेंटरही येथे लवकरात लवकर सुरु करणार असल्याची माहिती दिली. यावेळी जावली पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सतिश बुध्दे, मेढा नगरपंचायत मुख्याधिकारी अमोल पवार,मेढा शिवसेना शहर अध्यक्ष सचिन जवळ, सामाजिक कार्यकर्ते संजय वीर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,जावलीतील नागरिकांना तपासणी कामी तसेच विविध कारणास्तव सातारला जावे लागत होते परंतु येथे होणाऱ्या सुसज्ज हॉस्पिटलमुळे आता त्रास कमी होणार असून वेळेचीही बचत होणार असल्याने वेळीच रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यावेळी उपस्थित असणारे गट शिक्षण अधिकारी सतिश बुध्दे यांनी ही याबाबत माहिती देताना सांगितले की , मेढा येथिल जुने बचत गट येथे ३० बेड ऑक्सिजन सेंटर व जुन्या आय.टी.आय. इमारतीत ३० बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात येत असून जावली विभागातील रुग्णाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले जाणार नसून नागरीकांना येथे विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार यांनी ही यावेळी मेढा येथे उभारण्यात येणारे ६० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल महत्वाचे ठरणार असून यामुळे ग्रामीण रुग्णालयांवर येणारा भार हलका होणार असून स्थानिक नागरीकांनी लोकसहभागातून उभारलेले हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध होईल तसेच कोव्हीड रुग्णांचा मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
लोकसहभागातुन उभारण्यात येत असलेल्या सेंटरला जावलीतील नागरीकांनी उत्स्फुर्तपणे लोकवर्गणीच्या माध्यमातुन जमेल तशी मदत करावी असे आवाहनही जावलीचे तहसिलदार, गटशिक्षण अधिकारी,मेढा नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी केली असून या बाबत अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा असेही सुचित केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular