Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीया शासनाला कोयना धरणाचे पाणी पूूूजन करण्याचा नैतिक अधिकार नाही ; राजाभाऊ...

या शासनाला कोयना धरणाचे पाणी पूूूजन करण्याचा नैतिक अधिकार नाही ; राजाभाऊ शेलार यांची परखड टिका

पाटण दि. 14 ( प्रतिनिधी ) कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विकासात्मक धोरणांवर पाणी सोडणाऱ्या या शासनाला कोयना धरणातून पाणी पूजन करण्याचा नैतिक अधिकार नाही. भरपूर पाऊस झाला, धरणात मुबलक पाणी साठा झाला यात यांनी काय पराक्रम केला ? गेल्या ४ वर्षात धरणग्रस्तांचा एकही प्रश्न यांना सोडवता आला नाही,चांगल्या चाललेल्या पर्यटन विकासाला खिळ घालून विरोध करणार्‍यांनी येथील बोटींग बंद पाडले. कोयनेच्या विकासाचे वाटोळे केले ते आ. देसाई हे गुपचूप येवून हे पाणी पुजन करून पाणी सोडण्याचा पराक्रम करून गेले त्यांनी आधी कोयना भुमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले हे जाहीर करावे आणि मगच पाणी पुजनाची नौटंकी करावी अशी परखड टिका पंचायत समिती उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली.
या पत्रकात राजाभाऊ शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, कोयना प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आ. शंभुराज देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत. येथे पुर्वी पर्यटन विकास चांगल्या प्रकारे सुरू होता मात्र तेथेही कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करून यांनी बोटींग बंद पाडण्याचे महापाप केले. यामुळे पर्यटनावर गंभीर परिणाम तर झालेच याशिवाय स्थानिकांना दळणवळासह उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर झाला .चार वर्षांपूर्वी समृद्ध असणारा हा विभाग यांच्याच राजवटीत पुर्णपणे बकाल झाला. कोयनेची शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली त्यावर यांनी काय केले, इथल्या कंपन्या, कामगार बाहेर गेले , नेहरू गार्डन उध्वस्त झाले त्यावर या संसदपटूंनी विधिमंडळात कधी आवाज उठविला. केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भावनिक आवाहने, बुद्धीभेद आणि सुडाच राजकारण करणार्‍या आ. देसाई यांना येथील भुमिपुत्र, प्रकल्पग्रस्त कधीही माफ करणार नाही. कोयना धरणातील विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला धरण जवळपास भरत आले त्यामुळे गुपचूप येवून पुजा करून जाणाऱ्या आ. देसाई यांचे यात नक्की योगदान काय ? असा स्थानिकांचा संतप्त प्रश्न आहे. येथे याच पावसामुळे स्थानिक अडचणीत आले आहेत त्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे हे पहायला त्यांना वेळ नाही . मुख्यमंत्री यांनी आश्वासन देवूनही कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जैसे थेच आहेत त्यामुळे येथे येवून कोयनेचे पाणी पुजन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार त्यांना नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करता शासकीय ठिकाणी जावून अशा पद्धतीने पूजन करणे म्हणजे कायद्याची पायमल्ली व न्यायालयाचा अवमान असल्याने याबाबतही संबंधितांची चौकशी होवून त्यांचेवर योग्य त्या कारवाया व्हाव्यात अशी मागणीही शेवटी राजाभाऊ शेलार यांनी केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular