सातारा : खेळांमुळे विद्यार्थ्यार्ंंमध्ये शिस्त, निर्णयक्षमता सांघीक भावना आणि जय पराजय पचविण्याची ताकद निर्माण होते. शालेय जिवनापासून अंगिकारलेल्या खिलाडू वृत्तीमुळे आयुष्यातील कठीण प्रसंगाना सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त होते. असे उद्गार समीर शेख यांनी काढले.
सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार-शेंदूरे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मार्गदर्शन करताना वरील उद्गार काढले. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलीत करुन झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शबनम तरडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी क्रिडा शिक्षिका सौ. सोनाली लेवे, बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. मंजीरी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमेश यादव यांनी खेळाडूंना सांघीक शपथ दिल्यावर शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या बाल कलाकारांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळाबाह्य विविध स्पर्धात यश संपादन केलेल्या खेळाडूंचा संन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय खेळाडूंनी सूर्यनमस्कार, योगासने, मल्लखांब, कबड्डी, क्रिकेट व फुटबॉल खेळांची प्रात्याक्षिके सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सकुंडे यांनी केले.
कोटेश्वर मंदिरावर सादर झालेले खेळ व प्रात्याक्षिके पाहण्यासाठी शाळेच्या पालकांची मोठी उपस्थिती होती.
खिलाडू वृत्तीमुळे आयुष्यातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळते : समीर शेख
RELATED ARTICLES