सातारा : संपूर्ण शाहूपुरीवासियांना सद्यस्थितीत कृष्णा नदी माहूली येथून पाणी पुरवठा केला जातो.
या परिसराचे निरीक्षण केले असता हा संपूर्ण परिसर, विशेषत्वाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पंपिंग स्टेशन परिसर जलपर्णीने व्यापलेल्या अवस्थेत असल्याने कदाचित शाहूपुरीस होणा-या शुद्ध पाणी पुरवठ्यावरील चुकीचा परिणाम लक्षात घेऊन शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आज, कृष्णा नदी पुलापासून ते पंपिंग स्टेशन पर्यंतचा संपूर्ण परिसर जलपर्णीमुक्त करण्यासाठी एकजूट दाखवून त्यात बहूतांशी यशही मिळविले.
सकाळी सात वाजता सुरू केलेल्या या मोहिमेत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसलेंसह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुमार मोहिते, नवनाथ जाधव, प्रा.डॉ.सुजित जाधव, नितीन तरडे, पिंटू गायकवाड जगदीश भोसले, अंकुश इथापे, महेश जांभळे, अजय भोसले, अभय भोसले, निशांत केंडे, सुमित शेटे, आशुतोष भोसले यांचा प्रामुख्याने समावेश होता.
कृष्णा नदीस माता व पाणी म्हणजेच जीवन देणारी जीवनदायिनी म्हणतो त्या नदीपात्राची अशारितीने सेवा करण्याची संधी मिळाली हेच आमचे भाग्य अशीच भावना सर्व कार्यकर्त्यांची या मोहिमेनंतर होती.