Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीकुठे गेला अच्छे दिन चा नाराः आ. बाळासाहेब पाटील

कुठे गेला अच्छे दिन चा नाराः आ. बाळासाहेब पाटील

कराडः गत निवडणुकीमध्ये सवंग लोकप्रेयतेसाठी अच्छे दिन आयेंगे या सारख्या खोट्या घोषणा देऊन देशातील जनतेची दिशाभूल करून जनतेची घोर निराशा केली. पेट्रोल, डिझेल, गॅस जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले दर, त्याचा लोकांच्या जीवनमानावर झालेला विपरीत परिणाम त्यामुळे जनता हवालदिल झालेली असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठे गेला अच्छे दिनचा नारा असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केला.
ते राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मौजे उंब्रज, ता.कराड व पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यास कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सातारा जि.प.सदस्य संपतराव जाधव, सह्याद्रि कारखान्याचे संचालक पै. संजय थोरात, उद्धवराव फाळके, वसंतराव यादव, शिवाजीराव कुरकुटे, संग्रामसिह पलंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोपाळराव येवले, प्रमोद पुजारी, उत्तम कांबळे, शिवाजीराव कुरकुटे, संजय थोरात, सुधाकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, मागील साडेचार वर्षात मात्र भाजप सरकारने फक्त मोठ्या घोषणा करून देशातील जनतेची फसवणूक केली आहे, म्हणून या पुढील काळात आदरणीय पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी देवराजदादा पाटील म्हणाले की, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांना मानणारा असून, त्यांच्याच विचारांची पाठराखण करणारे आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. याच विधायक विचारांचा वारसा जपण्याचे काम आमदार बाळासाहेब पाटलांनी या मतदार संघात केले आहे. इथून पुढे आमदार बाळासाहेब पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी कराड उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य द्या, असे आवाहन यावेळी देवराज पाटील यानी केले. याप्रसंगी डी. बी.जाधव यांनी सूत्रसंचालन केले व पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular