मेढा प्रतिनिधी- गुणवंत कामगार प्रतिष्ठान यांचे वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श कामगार पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात दैवज्ञ मंगल कार्यालय सातारा येथे संपन्न झाला.
हा पुरस्कार वितरण सोहळा कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे. आणि गोदरेज अँड बॉईज मेन्यू कंपनी लिमिटेड ( लॉकिंम मोटर्स ग्रुप ) शिरवळ प्लांट हेड श्री अभय पेंडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गुणवंत कामगार प्रतिष्ठान अध्यक्ष श्री इकबाल काझी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व सल्लागार श्री गजानन घाडगे यांनी केले यावेळी या कार्यक्रमात श्री.नितीन देशपांडे यांचा परिचय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सल्लागार श्री गोपाळराव खजुरे यांनी
केला तसेच श्री. अभय पेंडसे यांचा परिचय प्रतिष्ठान चे सल्लागार श्री अशोकराव जाधव यांनी केला. मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इकबाल काझी यांचे हस्ते करण्यात आला त्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात श्री सुनील बंडू इंगवले कूपर कार्पोरेशन प्रा. लि. सातारा, श्री नंदकुमार बाबुराव बधे गोदरेज अँड बॉईज मेन्यू कंपनी लिमिटेड ( लॉकिंम मोटर्स ग्रुप ) शिंदेवाडी शिरवळ,
श्री संजय शंकरराव पिसाळ गरवारे टेक्निकल फायबर्स ली वाई, विलास सदाशिव भरगुडे गोदरेज अॅण्ड बॉईज म्यॅन्यु कं. लि ( लॉकिंम मोटर्स ग्रुप ) शिंदेवाडी शिरवळ,, श्री अरविंद नामदेव चौधरी गरवारे टेक्नीकल फायबर्स लि. वाई, श्री किशोर काशिनाथ जाधव वालचंद नगर इंडस्ट्रीज लि सातारा रोड , श्री विकास चंद्रकांत धुमाळ महाराष्ट्र स्कूटर्स ली. सातारा
या सात कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सन्मान प्रमूख पाहुणे नितीन देशपांडे यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
या आदर्श कामगार पुरस्कारावेळी त्यांचा परिचय ,त्यांनी केलेले कार्य यांची माहिती श्री हेमंत ढवळे, सौ श्रद्धा करंदीकर, संजय पवार, श्री जयंत देशपांडे यांनी करून दिला .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे नितिन देशपांडे यांनी या २५ व्या पुरस्कार वितरण समारंभाचे विशेष कौतुक करून सातत्याने उपक्रम राबविल्याबददल गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे आणि सर्व सहकारी यांचे विशेष अभिनंदन केले तसेच सर्व आदर्श कामगार यांचा झालेला सपत्नीक सत्काराने ते भारावून गेले.यावेळी अभय पेंडसे यांनी ही प्रतिष्ठानचे विविध उपक्रमांचे कौतुक करून लॉकिंग ग्रुप गेली वीस वर्षे प्रतिष्ठांचे विविध उपक्रमात सहभागी असल्याचे सांगून त्यांनी या राबवलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
आदर्श कामगार पुरस्कारप्राप्त कर्मचारी यांच्या वतीने श्री विकास धुमाळ व श्री संजय पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर अध्यक्षीय भाषणात इकबाल काझी यांनी प्रतिष्ठानचे वाटचालीचा आढावा घेतला तसेच विविध आस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक्क धन्यवाद मानले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे कार्याध्यक्ष जयंत देशपांडे यांनी केलेे तर माजी अध्यक्ष श्री अशोकराव जाधव यांनी आभार व्यक्त केले यावेळी ह भ प श्री चंद्रकांत उदावंत यांनी पसायदान सादर केले या कार्यक्रमास सातारा, वाई ,शिरवळ, कोरेगाव , खंडाळा, सातारा रोड, येथील कामगार कर्मचारी आणि पुरस्कार प्राप्त कर्मचारी यांचे कुटुंबीय, नातलग.मित्र परिवार बहुसंख्येने उपास्थित होते.
दिमाखदार समारंभात आदर्श कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
RELATED ARTICLES