म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने): चोराडे गावचे शहीद कमांडो सुरेश पिसाळ यांचे स्मृती स्मारक युवापिढीसाठी प्रेरणास्त्रोत बनेल, तरी जास्तीत जास्त युवकांनी शहीद सुरेश पिसाळ यांची प्रेरणा घेउन सैन्य दलात भरती व्हावे असे प्रतिपादन कर्नल रमण शर्मा
यांनी केले.
ते चोराडे ( ता.खटाव ) येथे शहीद कमांडो सुरेश पिसाळ
स्मृती स्मारकात पुर्णाकृती पुतळयाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमास मा.जि.प.सदस्य जितेंद्र पवार,वर्धन अॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम,जिल्हा सैनिक अधिकारी राजेंद्र जाधव,सैनिक सहकारी बॅकेचे चेअरमन कॅप्टन उदाजीराव निकम, वीरमाता श्रीमती भार्गिथी पिसाळ, वीरबंधु रमेश पिसाळ, वीरबहिण आशा चव्हाण यांची उपस्थिती
होती.
कर्नल शर्मा पुढे म्हणाले की युवापिढीने धाडसाने व जिद्दीने तयारी करुन सैन्यदलात भरती व्हावे, तसेच सध्या महिलांनाही सैन्य दलात विविध संधी उपलब्ध असुन त्याचा त्यांनी फायदा करुन घ्यावा,
यावेळी धैर्यशील कदम,जितेंद्र पवार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेन्द्र जाधव,कॅप्टन उदाजीराव निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने वीरमाता व वीरबंधु यांचा सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमास भाऊसो पिसाळ,सुनिल पिसाळ,
श्रीकांत पिसाळ,बजरंग पिसाळ,डाॅ.अनिल पिसाळ,
महेश पिसाळ,श्रीनिवास पिसाळ भिमराव जानकर, मुख्याध्यापक दत्तात्रय ननावरे,सागर लोकरे, जि.प.मुख्याध्यापक आळे मॅडम,दिपक चव्हाण,राजेंद्र पिसाळ,आदि सह, आजी-माजी सैनिक,शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

