सातारा : शहरातील वाहतुक व्यवस्थेला शिस्त लागावी,रस्ते सुरक्षितता वाढावी यासाठी सातारा पोलीसाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचा भाग म्हणुन आता चलान सुध्दा ई चलान प्रणाली मार्फत दिले जाईल त्या प्रणालीच उद्घाटन पोलिस अधिक्षक संदिप पाटील याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाखेचे सहा.पो.निरीक्षक एस.एन.घाडगे व वाहतुक नियंत्राण करणारे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी या सुविधेची माहिती देताना सांगितले की वाहन चालकांकडुन वाहतुकीचे नियंमांचे जास्तीत जास्त पालन व्हावे व जे वाहन चालक वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करतात त्यावर कारवाई करण्या करीता या प्रणालीचा फायदा होणर आहे. जे वाहन चालक नियम पाळत नाहीत किंवा वाहतुक नियमांचा नंबर घेवुन वाहन मालकांचे पत्यावर पोलीस कर्मचारी यांचा बरोबर वाद घालुन कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणारे वाहतुक शाखे कडून होणारी कारवाई टाळणा-या वाहन चालकांवर या मुळे अंकुश लावण्याचा प्रयत्न प्रशासना मार्फत सुरु असेल. भविष्यात नमुद कार्यप्रणाली सी.सी.टी.व्ही.च्या मदतीने आणखीनच अद्यावत करण्यात येणार आहे, जेणे करुन वाहन चोरी,शेाध व वाहतुक नियमन अधिक परिणाम कारक होईल. त्याच प्रमाणे सातारा वाहतुक शाखेकडे कार्यान्वित करण्यात आलेली प्रणाली ही सांगली व सोलापुर येथे कार्यरत असलेल्या प्रणाली पेक्षा आणखी अद्यावत करण्यात आली असुन त्या द्वारे वाहतुकीस अडथळा ठरणा-या रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले यांवर ही कारवाई करणेत येणार असल्याचे यांनी शेवटी सांगितले .
वाहतूक शाखेत ई चलान प्रणालीचे संदिप पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
RELATED ARTICLES