Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमांजराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत ; बिबट्या सह मांजराचा मृत्यू ; सह्याद्री...

मांजराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत ; बिबट्या सह मांजराचा मृत्यू ; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील आंबेघर येथील घटना

 

पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये येणाऱ्या रासाटी ( आंबेघर ) या गावाजवळ असणाऱ्या धनगरवाडया जवळ 20 फूट खोल विहारीत मांजराच्या मागे धावत जाणाऱ्या बिबट्याचा मांजरासह पाण्याने भरलेल्या विहारीत पडून म्रुत्यू झाला आसल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान या खोल विहारीत पडलेला हा बिबट्या सह मांजर फूगून वर आल्यामुळे दोन दिवसापूर्वी हा प्रकार झाला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये एवढी मोठी घटना घडून सुध्दा वन्यजीव विभागाला याची माहिती नाही. यांचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत सविस्तर व्रूत असे की पश्चिम घाटावर साकारण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये रासाटी आंबेघर या गावाचा समावेश येतो.या गावाजवळ असणाऱ्या धनगरवाडा जवळ 20 फूट खोल विहीर आहे.दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एका मांजराचा पाठलाग करताना मांजराबरोबर हा बिबट्या सुध्दा या खोल विहीरीत पडला आहे.यामुळे हा बिबट्या व मांजर यामध्ये म्रुत्यूमुखी पडले होते.आज सायंकाळी हा बिबट्या व ससा फूगून विहिरीवर तरंगत आसल्याचे ग्रामस्थांना आढळून आला असताना बिबट्याला व मांजराला पहाण्यासाठी नागरिकांनी विहिरी भोवती गर्दी केली होती.
याबाबत वन्यजीव विभाग अंधारात आहे. याबाबत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अशोक देवकर यांच्याशी संपर्क साधला आसता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे. मात्र वन्यजीव विभागाने येथील बिबट्यांच्या संरक्षणार्थ आणि नागरी वस्ती च्या स्वरक्षणार्थ कोणत्याच केलेल्या दिसत नाहीत. वन्यजीव विभागाच्या अशा नीयोजन शुन्य कारभारात मुळे बिबट्या सारख्या जंगली जनावरांचा वावर मानवी वस्तीकडे आणि जंगलाच्या बाहेर वाढल्याचा दिसुन येत आहे. यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

फोटो – विहिरीत पडलेला मृत अवस्थेतील बिबट्या आणि ससा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular