म्हसवडः महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ल्या मध्ये प्रमुख मागण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 22 जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन केले असून सातारा जिल्ह्यातील लिपिकांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश इंगवले यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने सातत्याने लिपिक वर्गीय कर्मचार्यांवर अन्याय केला असून त्याला वाचा फोडण्यासाठी शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषद स्थापन करण्यात आली आहे. हक्क परिषदेच्या वतीने राज्य शासनाकडे लिपिकाच्या ग्रेड पे वेतनात सुधारणा करणे,बक्षी समितीच्या शिफारशी नुसार केंद्रप्रमाणे राज्यातील शासकीय व निमशासकीय लिपीकाना दहा,वीस,तीस,वर्षाची पदोन्नती दिली पाहिजे,इत्यादी प्रमुख मागण्या आहेत.
या व अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी लिपिक हक्क परिषदने राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर 22 जानेवारीला मोर्चाचे आयोजन केले आहे.सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी व लिपिकाची एकजूट दाखवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लिपिक बांधव व भगिनींनी या मोर्चात सामील होण्याचे आवाहन रमेश इंगवले यांनी केले आहे.
लिपिक हक्क परिषदेचा 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
RELATED ARTICLES