मेढा ( वार्ताहर ) :- सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने मेढा तसेच संपूर्ण जावलीकर नागरीक हैराण झाले असतानाच लॉक डाऊन कालावधी वाढवला गेल्याने नागरिकांना भाजीपाला, किराणा साहित्य मिळवायचे कसे ? याशिवाय अन्य ही समस्या निर्माण झाल्या आहेत
प्रशासन विभागाने नागरीकांची काळजी घेण्याकरीता हा लॉक डाऊन वाढवला खरा परंतु या वाढत्या लॉक डाऊन मुळे नागरीकांना पुरेसा किराणा माल, भाजीपाला खरेदी करणे अवघड बनले आहे. सुरुवातीला १ते १५ मे असा लॉक डाऊन वाढविला गेला त्यावेळी मेढा नागरीक , भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार यांनी ही शासनाच्या आदेशानुसार हा कडक लॉक डाऊन यशस्वीपणे पार पाडला होता. त्यानंतर लगेच हा लॉक डाऊन १५ मे पासून पूढे ३१ मे अखेर वाढविला गेल्याने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. या लॉक डाऊन काळात बेरोजगारीत वाढ झाली आहे. नागरीकांना, ग्राहकांना आपले कर्ज हफ्ता भरताना कसरत करावी लागत आहे. काही फायनान्स कंपन्या कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना पैसे भरा अन्यथा आम्ही वेगळ्या मार्गाने जावू असा दम देत आहेत. त्यामुळे मानसिक ताण तणाव वाढत आहे.
या लॉक डाऊन काळात हातावर पोट असणारे भाजीपाला विक्रेते, कामगार छोटे व्यावसायिक,तसेच किराणा दुकानदार यांना चांगलाच तडाखा बसला असून नागरीकांनाही याची झळ बसू लागली आहे. काही शहरात दुकाने सकाळी ९ ते ११ या वेळेत तर कधी कधी छुप्या मार्गाने दिवसभर सुरू असून मेढा किराणा माल, भाजीपाला विक्री बाबत कोणतीच भुमिका घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासन नागरीकांची काळजी घेत आहे या बरोबरच प्रशासनाकडून मेढा आणि जावतीतील गावात काही वेळ भाजीपाला, किराणा माल विकण्यायास परवानगी मिळावी अशी मागणी व्यापारी वर्गातुन होत आहे. परंतु बाजारपेठ काही वेळ उघडली गेली तर बाहेरून येणारा ग्राहकवर्गामुळे अडचणी निर्माण होत असून याबाबत निर्णय घेताना प्रशासन अधिकारी यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चाही व्यक्त केली जात आहे.
लॉक डाऊन ठिक आहे पण …भाजीपाला, किराणा मिळवायचा कसा ? अचानक वाढलेल्या लॉक डाऊनमुळे जावलीकरांना अनेक समस्या निर्माण
RELATED ARTICLES

