औंध(वार्ताहर):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औंध पोलीस स्टेशनमार्फत अनेक कडक उपाय योजले जात असून संचारबंदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औंध पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बारा गावातील 23जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती औंधचे सपोनि उत्तम भापकर यांनी दिली. दरम्यान पुसेसावळी येथे अवैध्यरित्या वाळू व ताडी वाहतूक प्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खटाव माण तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या औंधसह परिसरातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारची ढिल राहू नये तसेच बाहेर गावाहुन बेकायदेशीर पणे येणाऱ्या व्यक्तींना चाप बसावा, कोरोनाचा फैलावू नये यासाठी काटेकोरपणे पालन केले जावे यासाठी औंध पोलीस स्टेशनने विनाकारण फिरणाऱ्या तसेच जिल्हा बंदी संचारबंदीच आदेशाचे उल्लंघन करून बाहेर गावाहून आलेल्या 23जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये औंधमधील सात, पुसेसावळी तीन, चोराडे दोन,पारगाव एक,वडी दोन,कळंबी दोन,भूषणगड एक,खबालवाडी एक,खरशिंगे एक,वरुड एक,जायगाव एक, नांदोशी एक
अशा एकूण तेवीस जणांचा यामध्ये
समावेश आहे. दरम्यान पुसेसावळी ते वडूज रस्त्यावर वंजारवाडी कँनाँलवरुन अवैधरित्या एक ब्रास वाळू वाहतूक करणार्या उमेश बळवंत कदम वय 40 रा.पुसेसावळी याच्यावर तसेच पुसेसावळी येथून अवैध्यरित्या ताडी वाहतूक करणाऱ्या प्रविण पांडुरंग चव्हाण वय 39 रा गोरेगाव वांगी यांच्या वर ही
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमेश बळवंत कदम याच्याकडून नऊ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू तसेच चार लाख रुपये किंमतीचा ट्रँक्टर असा चार लाख नऊ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तर
गोरेगाव वांगी ता.खटाव प्रविण चव्हाण
याचेकडून बाराशे रूपयै किंमतीची ताडी ,रोख बाराशे रुपये, चाळीस हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 42हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
यापुढील काळात ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती उत्तम भापकर यांनी दिली असून कोणीही संचारबंदी तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.