Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमेढा शहर व परिसरातील २७ गावातील लॉक डाऊनमुळे कोरोनाला हद्दपार करण्याकरीता प्रशासन...

मेढा शहर व परिसरातील २७ गावातील लॉक डाऊनमुळे कोरोनाला हद्दपार करण्याकरीता प्रशासन सज्ज

मेढा मोहाट पुलावर बंद केलेला रस्ता

बंद बाजारपेठ

मेढा ( वार्ताहर ) – मेढा आणि परिससरातील २७ गावात लॉक डाऊनमुळे कमालीची शांतता पसरली असून कोरोनाला हद्दपार करणे कामी प्रशासन सज्ज झाले आहे.
कोरोना विषाणुच्या लढाईत मेढा नगरीने आपले १०० % योगदान दिले असून फक्त दवाखाने आणि मेडिकल, घरगुती गॅस, दूध या आवश्यक सुविधाच फक्त सुरू आहेत. मेढा शहरातील सर्व बँका, पतसंस्था पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. मेढा आणि परिसरातील गावांनी गावातील येणे- जाणेचे रस्ते बंद केल्यामुळे वर्दळ कमी झाली आहे. लॉक डाऊनमुळे रस्ते पुर्णपणे ओस पडले आहेत. प्रशासन विभाग संपूर्ण परिसरावर बारीक नजर ठेवत आहे.कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जावलीचे प्रशासकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणा, पोलिस खाते जीवाचे रान करत करत असून संपूर्ण जावली ” गो कोरोना ” चा नारा देत आहे. सर्वप्रथम जावली तालुकयातील निझरे गावी कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या त्यानंतर मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव आल्याने जावलीकर आनंदी होते त्यातच त्याच दिवशी पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण सापडल्याने समस्त जावलीकरांच्या काळजात धस्स झाले होते. त्यानंतर कित्येक संशयितांना भणंग येथे कॉरन टाईन करण्यात आले ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्रच भितीदायक वातावरण निर्माण झाले होते.
या भितीदायक परिस्थीती मध्ये जावली विभागाला लाभलेले सक्षम व तडफदार अधिकारी जावलीचे तहसिलदार शरद पाटील, गट विकास अधिकारी सतिश बुध्दे स.पो.नि.नीळकंठ राठोड, मुख्याधिकारी अमोल पवार , तालुका आरोग्य अधिकारी , नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच लॉक डाऊन केलेल्या गावातील सरपंच व पोलिस पाटिल यांनी एकत्रित येवून चालविलेल्या टिमवर्क मुळे तालुक्यातुन कोरोनाला हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे.यासाठी जनतेने आधिकारी यांना व त्यांच्या या चालु असणाऱ्या कार्याला सहकार्य करूनकार्यवाहीची अंमलबजावणी करावी त्यामुळेच तालुका कोरोना मुक्त होण्याचे ध्येय साकारता येईल आणि जावली कोरोना मुक्त होईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular