महाबळेश्वर : निसर्गरम्य अशा लॉडविक पॉइर्ंटवर शहापुर येथील विनोद शंकर जाधव (वय 40) हा आपला साडु नितीन भोईरला फोटोसाठी पोझ देत असताना मागे सरकताना कड्यावरील सुकलेल्या गवतावरून पाय घसरून कड्यावरून साधारण 150 खोल दरीत कोसळला साडु विनोद हा कड्यावरून पडताना पाहुन नितीन भोईर हा जागीच चक्कर येवुन पडला. नितीन हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. कड्यावरून 150 फुट खोल कोसळुनही विनोद सुदैवाने वाचला असून प्राथमिक उपचारानंतर त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथील रवाना करण्यात आले आहे.
विनोद जाधव रा. शहापुर व नितीन भोईर रा. भिवंडी हे दोघे नात्याने साडु बंधु आहेत हे दोघे आपल्या कुटूंबांसह काल महाबळेश्वर फिरण्यासाठी येथे आले होते. आज दुपारी ते हत्तीचा माथा म्हणुन प्रसिध्द असलेल्या लॉडविक पॉइर्ंटवर फिरण्यासाठी गेले होते हा पॉइर्ंट एकुन तीन टप्प्यात पाहता येतो पहिल्या टप्प्यात वाहनतळ असून तेथुन जावलीचे खोरे व भला मोठा डोंगरकडा नजरेस पडतात त्या नंतर पाय वाटेने पुढे गेल्या नंतर दुसर्या टप्प्यावर आपण पोहचतो तेथे लॉडविक या ब्रिटीश गव्हर्नरचे स्मारक असून तेथुनही अतिशय नयनरम्य निसर्ग दृष्टीस पडतो. त्यानंतर डोंगराच्या माथ्यावर पाय वाट असून दोन्ही बाजुला डोंगर कडा आहे. हा रस्ता धोकादायक असल्याने हत्तीच्या माथ्याकडे जाणारे रस्त्यावर दोन्ही बाजुला लोखंडी रेलिंग लावण्यात आले आहे. हे रेलिंग काही ठिकाणी तुटलेले आहे याच पाय वाटेने पुढे हत्तीच्या माथ्यावर आपण पोहचतो तेथुन किल्ले प्रतापगडासह अंबेनळी घाट आणि जावलीच्या खोरयातील अथांग पसरलेले सदाहरीत जंगलाचे नयनरम्य दृश्य नजरेस पडते. जाधव आणि भोईर हे साडु बंधु आपल्या कुटूंबासह लॉडविक पॉइर्ंट वरील हत्तीचा माथा पाहुन परत येत असताना विनोदने आपला एक छान फोटो घेण्याची विनंती नितीनला केली व विनोद हा रेलिंग तुटलेल्या ठिकाणी थांबुन कडयाच्या बाजुला फोटोसाठी पोझ देवुन उभा राहीला. विनोद जेथे उभा राहीला तेथे सुकलेले गवत होते तर त्याच्या पायात नविन बुट घातलेले होते या गवता वरून नविन बुट सरकत असतानाही विनोद मागे सरकत होता आणि पाहता पाहता विनोदचा तोल गेला आणि तो 150 फुट खोल दरीत कोसळला विनोदला कडयावरून खाली कोसळताना पाहुन नितीनला जागेवरच चक्कर आली आणि तो जागेवरच कोसळला विनोद कडयावरून खाली कोसळताच सर्वत्र आरडा ओरडा सुरू झाला आरडा ओरडा ऐकुन पॉईंटवर असलेले क्षेत्र महाबळेश्वर येथील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व स्टॉल धारक अनिल डावले गणेश वागदरे दत्तात्रय हिरवे धोंडीराम शेलार विजय केळगणे दिपक बिरामणे दिपक जाधव धावत आले त्यांनी पायवाटेने कडयात खाली उतरले व विनोद जेथे कोसळला होता तेथे जावुन पोहचले विनोद हा गंभिर जखमी अवस्थेत जागेवरच पडुन होता स्थानिक मंडळींनी त्याचा पाठीवर खांद्यावर घेवुन वर येण्यास प्रारंभ केला.
लॉडविक पॉइर्ंट वरून पर्यटक युवक कोसळल्याची खबर पोलिसांना व नंतर येथील महाबळेश्वर आणि सहयाद्रि ट्ेकर्स यांना समजली. या दोन्ही संघटनांच्या सुनिल भाटीया, संजय पार्टे, अनिल केळगणे, अमित कोळी, बाबु वागदरे आदी जवानांनी आपल्या जवळ असलेले बचाव साहीत्य घेवुन घटना स्थळाकडे धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने ट्ेकर्सच्या जवानांनी स्ट्ेचरवर घेवुन जखमी विनोद जाधव याला वर आणले तातडीने त्याच येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी रूग्णवाहीकेतुन सातारा येथे रवाना करण्यात आले.
सेल्फीच्या नादात लॉडविक पॉईंटवरुन युवक दरीत कोसळला ; प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
RELATED ARTICLES