लोणंद : लोणंद – सातारा रस्त्यावर गोटेमाळ येथे 342 पोती, तीन टन वजनाचा सुमारे 44 लाख रुपये किंमतीचा हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा असा बंदी असलेला माल जप्त करण्यात आला. या कारवाईत गुटखा आणि र आयशर टेम्पो असा सुमारे 52 लाख रुपयांचा ऐवज लोणंद पोलिसांनी पेट्रोलिंग करताना पकडला.
लोणंद पोलिस स्टेशनचे स. पो. नि गिरिश दिघावकर यांना पेट्रोलिंग करताना गुटखा घेऊन टेम्पो कर्नाटकहून सातारा मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी या ट्रकवर नजर ठेवली होती. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सपोनि दिघावकर यांनी एएसआय वाघमारे, पो कॉ. व्ही बी शिंदे यांचे समवेत सापळा लाऊन गोटे माळ येथे टेम्पो ाक16- -ए – 9158 ला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 342 पोती गुटखा यामध्ये सुमारे तीन टन वजनाचा बंदी असलेला हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा असा सुमारे 44 लाखांचा माल तसेच गाडीची किंमत मिळून असा सुमारे बावन्न लाख रुपये किंमतीचा माल जप्त केला. याबाबत अन्न व भेसळ विभागाने जप्त केलेल्या मालाची पाहणी करून लोणंद स्टेशनमध्ये फिर्याद देण्याची प्रकीया सुरु होती. या प्रकरणी टेम्पो चालक शेख ( रा. श्रीगोंदा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधिक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सपोनि गिरिश दिघावकर करीत आहेत.
लोणंदला 44 लाखांचा गुटखा जप्त
RELATED ARTICLES