Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी२ मार्च पासुन कोयनानगर येथुन लाँगमार्चला सुरवात.

२ मार्च पासुन कोयनानगर येथुन लाँगमार्चला सुरवात.

 

पाटण:- पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर येथील छ. शिवाजी क्रीडांगणावर सुरूच असुन १७ दिवस उलटूनही कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. डाॅ. भारत पाटणकर यांनी दि. २ मार्च पासुन कोयनानगर येथुन लाँगमार्चला सुरवात होईल असे जाहिर केले आहे. त्यानुसार कोयनानगर येथे शुक्रवारीच मोठ्या संख्येने इतर तालुका व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त दाखल होणार आहेत.
त्या दृष्टीने पाटण तालुका श्रमीक मुक्ती दल कमेटीसह तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांनी लाँगमार्चची जोरदार तयारी केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी लाँगमार्चसाठी लागणारी भांडी,रेशन,कपडे,अंथरुण-पांगरुन, सह साहित्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी आंदोलनाच्या १७ व्या दिवशी लाँगमार्चच्या पुर्व तयारी निमित्ताने आंदोलक प्रकल्पग्रस्तांनी भव्य साखळी करून छ.शिवाजी क्रिडांगणाला वेढा मारला. यावेळी कोयना धरणग्रस्तांचा विजय असो. धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहीजे, अशा घोषणा कोयनामाईच्या साक्षीने देत प्रकल्पग्रस्त जनतेने शिवाजी मैदान दणाणून सोडले.

कोयना प्रकल्पग्रस्त शनिवारी हजारोंच्या संख्येने कोयनानगर येथुन लाँगमार्चने निघणार असुन सातारा येथे पोहोचल्यावर प्रकल्पग्रस्त जनतेने सातारा जिल्हाधिकारी यांना जाब विचारण्याचा ठाम निर्धार केला आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular