मेढा प्रतिनिधि – सातारा जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा माचुतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या सर्वच प्रकारांत उज्ज्वल यश संपादन करुन आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
सामुहिक स्पर्धा प्रकारात गीतमंच स्पर्धेत प्रथम क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक , पोवाडा गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला.
वैयक्तिक स्पर्धा प्रकारात निबंध स्पर्धेत कु.अनुष्का प्रकाश शिंदे हिने द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत कु.अक्षता संतोष जंगम हिने द्वितीय क्रमांक, धावण्याचा स्पर्धेत आयुष अनिल सपकाळ याने प्रथम, लांब उडीत सिध्देश संतोष जाधव याने द्वितीय क्रमांक संपादन केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बॅंक संचालक श्री.चंद्रकांत आखाडे, संगीत शिक्षक श्री.शंकर पवार, पदवीधर शिक्षक श्री.संजय सोंडकर, श्रीम.सुजाता ढेबे , उपशिक्षक श्री.एकनाथ जावळे, कु.अनिसा वारुणकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच उपक्रमशील शिक्षक श्री.अंकुश केळगणे,श्री.राजेंद्र कुंभार , यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल गटविकास अधिकारी मा.अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी मा.आनंद पळसे, केंद्र प्रमुख मा.दीपक चिकणे ग्रामपंचायत सरपंच श्री.सुरेश शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रकाश शिंदे सर्व पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.