मायणी:- (सतीश डोंगरे) आयुष मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य व द ट्रीनिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणार महा-आयुष कमल पुरस्कार सन २०१७-१८डॉ. सुशांत आ.देशमुख यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला
मागील तीन वर्ष्याच्या त्यांच्या यशस्वी रुग्ण सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार गणेश कला व क्रीडा मंच पुणे या ठिकाणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता, ट्रीनिटी ग्रुपचे अध्यक्ष श्री.जोफेस नस्त्या या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी आयुषराज मंत्री भारत सरकारचे श्रीपादजी नाईक,आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
याच ठिकाणी डॉ, सुशांत देशमुख यांनी “चला जाणून घेऊ गुदगत विकार व उपचार या विषयावर जमलेल्या लोकांना व वैद्यांना मार्गदर्शन केले .डॉ.सुशांत देशमुख हे पुणे व मायणी ता.खटाव येथे गुदगत विकारावरती उपचार करतात.