महाबळेश्वर : येथील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विल्सन पॉइर्ंट वरील बीएसएनएल च्या टॉवर जवळ वणव्याने आग लागुन या आगील भारत दुरसंचार निगमचे ऑप्टीकल फायबर केबल साठीचे प्लास्टिक पाईप जळुन खाक झाले सुदैवाने पालिकेचा अग्नी शामक बंब वेळेवर पोहचल्याने आग दुरसंचार निगमच्या सेंटर पर्यंत पोहचली नाही अन्यथा दुरध्वनी व मोबाईल यंत्रणेत बिघाड होवुन सेवा खंडीत झाली असती.
विल्सन पॉइंर्ंटवर भारत दुरसंचार निगमचा टॉवर व त्याच्या शेजारी सर्व यंत्रणा असलेले सेंटर आहे हे सेंटर बंदीस्त बांधकामात आहे या टॉवर शेजारी मोठे मैदान असुन या मैदानावर केबल व त्याचे प्लास्टिक पाईपचे मोठे बंडल आहेत याच मैदानावर पावसाळयात गवत उगवते हे गवत सध्या वाळले होेते या वाळलेल्या गवताला आग लागली व ही आग हळु हळु सर्व मैदानावर पसरली या वणव्याने लागलेल्या आगीत दुर संचार निगमचे ऑप्टीकल फायबर केबल साठी लागणारे प्लास्टिकचे पाईप ठेवण्यात आले होते या पाईच काही बंडल या आगीत जळुन खाक झाले आगीचे काळया धुराचे लोट हवेत पसरले होते या आगीची खबर पालिकेत कळविण्यात आली तातडीने अग्नी शामक बंब विल्सन पॉइर्ंटवर पोहचला व आग टॉवर सेंटर कडे पसरत असतानाच प्रथम त्या बाजुकडील आग विझवुन सेंटर आगी पासुन वाचविण्यात आले पंधरा मिनीटात सर्व मैदानावरील आग एकाच बंबात आटोक्यात आली परंतु तो पयर्ंत आगीत प्लास्टिक पाईपचे काही बंडल जळुन खाक झाले होते.
आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आगीची खबर मिळताच दुर संचार निगमचे दिपक शिर्के रमेश चव्हाण व बापुराव खोमणे तातडीने घटना स्थळी दाखल झाले अग्नी शामक बंबा बरोबर राजेंद्र मोरे पि बी ननावरे आर बी पवार व संदीप पवार या कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून कमीत कमी वेळेत आग आटोक्यात आणली.
महाबळेश्वर येथील बीएसएनएलच्या टॉवरचे वणव्याच्या आगीने नुकसान
RELATED ARTICLES